भिवंडीतील कोन गावाला पुरापासून संरक्षणासाठी भिंत उभारावी; कपिल पाटील यांचे पतन विभागाला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 04:03 PM2021-09-21T16:03:06+5:302021-09-21T16:03:25+5:30
कल्याणच्या सीमेवर असलेल्या कोन गावात औद्योगिक वसाहतही आहे.
नितिन पंडीत
भिवंडी: औद्योगिक व नागरी वसाहत असलेल्या भिवंडीतील कोन गावाचे पावसाळ्यातील पुरापासून संरक्षण करण्यासाठी खाडीलगत पूरसंरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारच्या पतन विभागाकडे केली आहे.
कल्याणच्या सीमेवर असलेल्या कोन गावात औद्योगिक वसाहतही आहे. त्याचबरोबर कल्याण शहरालगत असल्यामुळे गावाच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाली. सध्या या भागाची लोकसंख्या ४० हजारांपर्यंत पोचली आहे. मात्र कोनलगत खाडीचा परिसर आहे. खाडी व जमिनीची पातळी समान असल्यामुळे पावसाळ्याच्या काळात कोन गावात पाणी शिरते. त्यातून नागरिकांबरोबरच औद्योगिक वसाहतीचेही नुकसान होते. त्यामुळे या भागात खाडीच्या पुरापासून संरक्षण होण्यासाठी पूरसंरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पतन विभागाकडे केली आहे.