कोरेगाव-भिमाची दंगल भाजपामुळेच - सप्तर्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 05:10 AM2018-01-16T05:10:37+5:302018-01-16T11:41:32+5:30
कोरेगाव - भीमाची दंगल ही भाजपानेच घडवून आणली आहे. गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत दलित व मुस्लीम मतदार एक होत असल्याचे भाजपाच्या लक्षात आले
राशीन (जि. अहमदनगर) : कोरेगाव - भीमाची दंगल ही भाजपानेच घडवून आणली आहे. गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत दलित व मुस्लीम मतदार एक होत असल्याचे भाजपाच्या लक्षात आले. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत ८० जागा कमी होतील, याची भीती भाजपा नेत्यांना आल्याने त्यांनी प्रत्येक मतदारसंघात जातीय वाद पेरला असल्याचा आरोप युवक क्रांती दलाचे संस्थापक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
खेड (ता.कर्जत) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाच्या बक्षीस वितरण समारंभासाठी ते आले होते. ते म्हणाले, गुजरात निवडणुकीत कमी जागा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका नजरेसमोर ठेऊन महाराष्ट्रात मराठा, माळी, धनगर व वंजारी या समाजात जातीवादाचे द्वेष पसरविण्याची भाजपा खेळी करीत आहे. आघाडी सत्तेच्या काळात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केलेला गैरव्यवहार पचविण्यासाठीच भाजपाच्या बिळात त्यांनी घुसखोरी केली. ते कसले आले पक्षनिष्ठ?, अशी टीका सप्तर्षी यांनी केली.
नांदेड : कोरेगाव भीमा येथे आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ३ जानेवारीला पुकारलेल्या बंद काळात आष्टी येथील दहावीतील योगेश जाधव याचा पोलिसांच्या कथित लाठीमारात मृत्यू झाला. त्याची दंडाधिकाºयांमार्फत चौकशी सुरू झाली असून जाहीर प्रगटनाद्वारे माहिती मागविण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची समिती चौकशी करणार आहे. दरम्यान, योगेशच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याचा प्रस्ताव हदगाव तहसीलदारांनी जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द
केला आहे.