कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 06:39 PM2024-11-23T18:39:42+5:302024-11-23T18:40:30+5:30
Karjat Jamkhed Assembly Election 2024 Result Live Updates: उमेदवार रोहित पवार यांची भाजपाच्या राम शिंदे यांच्याशी कडवी टक्कर सुरु आहे. अशातच रोहित पवार हे शेवटच्या फेरीअखेर ३९१ मतांनी आघाडीवर आहेत.
Karjat Jamkhed Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live बारामतीत शरद पवार कुटुंबातील उमेदवार युगेंद्र पवार यांचा पराभव झाला आहे. तर दुसरे उमेदवार रोहित पवार यांची भाजपाच्या राम शिंदे यांच्याशी कडवी टक्कर सुरु आहे. अशातच रोहित पवार हे शेवटच्या फेरीअखेर ३९१ मतांनी आघाडीवर आहेत. परंतू, एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड असल्याने व शिंदे यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केल्याने तेथील निकाल जाहीर करण्यात आलेला नाहीय.
कर्जत-जामखेड मतदारसंघात 26 फेऱ्या झाल्या आहेत. रोहित पवार यांना 1,25,396 मते मिळाली आहेत. तर राम शिंदे यांना 1,25,005 मते मिळाली आहेत. रोहित पवारांना 391 मतांची आघाडी मिळाली आहे.
एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या मशीनच्या स्लीपची मोजणी करण्यात येत आहे. यामुळे यानंतरच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राम शिंदे यांनी फेरमोजणीचा अर्ज दिल्याने रोहित पवार मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत.