धक्कादायक! जमिनीचा ताबा घेण्यासाठी कर्नलने गावात आणले लष्करी जवान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 08:37 PM2019-06-22T20:37:45+5:302019-06-22T20:57:34+5:30

खेड पोलीस स्टेशनमध्ये गायकवाड व भरणे यांनी परपस्परविरोधी फिर्याद दिली आहे.

karnal brought army soldiers for control of land | धक्कादायक! जमिनीचा ताबा घेण्यासाठी कर्नलने गावात आणले लष्करी जवान

धक्कादायक! जमिनीचा ताबा घेण्यासाठी कर्नलने गावात आणले लष्करी जवान

Next
ठळक मुद्देयाबाबत खेड पोलिस ठाण्यात अदयापही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही..

राजगुरूनगर (दावडी) : खेड तालुक्यातील गुळाणी येथे एका लष्करी कर्नलने जमिनीचा ताबा घेण्यासाठी चक्क ५० ते ६० जवान आणल्याची घटना घडली आहे. ३ तास लष्करी जवानांची दहशत गावात  दहशत होती. जमिनीचा ताबा घेण्यासाठी कर्नल केदार गायकवाड यांनी गावात लष्करी जवान आणले.

याबाबात सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुळाणी येथील परिमल विजय गायकवाड यांच्या कुटुंबातील काही व्यक्तीनी वारस हक्कांनी मिळालेली जमीन दिलीप नामदेव भरणे ( रा. मुळशी ) यांना सन २०१८ विकली होती. मात्र, गायकवाड कुटुंबियांनी ही जमीन आमची आहे म्हणून या जमिनीचा वाद दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. सध्या दावा दिवाणी न्यायालयात सुरू आहे.

भरणे यांनी १५ जुन रोजी शेतात नागरणीसाठी टॅक्टर घातला असता टॅक्टर ड्रायवर गणेश बाळासाहेब गाडे याला गायकवाड कुंटुबियांनी बेदम मारहाण केली होती. तसेच भरणे यांनी आम्हाला धमकावले याबाबत खेड पोलीस स्टेशनमध्ये गायकवाड व भरणे यांनी परपस्परविरोधी फिर्याद दिली होती. या बाबत खेड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक अरविंद चौधरी व सहाय्यक उपनिरिक्षक निलेश बडाख या घटनेचा तपास कार्य होते. आज (दि. २२ ) रोजी सकाळी ११ वाजता परिमल गायकवाड यांचा भाऊ कर्नल केदार विजय गायकवाड यांनी गुळाणी गावात लष्करी चार गाडया आणुन त्यामध्ये ५० ते ६० लष्करी जवान हत्यार सह घेउन आले. भरणे यांनी घेतलेली शेतजमिन लष्करी जवानांने वेढा देऊन चार टॅक्टर जमिनीत घालून शेत नांगरुन घेतले. सुमारे ३ ते ४या तास या घटनेमुळे दहशत पसरली होती. दरम्यान, एक सेवानिवृत्त लष्करी कर्मचारी तिथे गेला असता हा काय प्रकार आहे, असे विचारले असता. जवानांनी तुम्ही कोण असा प्रतिप्रश्न केला. मात्र सेवानिवृत्त स्वत: चे आय कार्ड दाखविल्यावर लष्करी जवानांसह कर्नल गायकवाड यांनी गुळाणी गावातुन पळ काढला.. याबाबत खेड पोलिस ठाण्यात अदयापही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. गावात दहशत निर्माण या घटनेबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही.

........................................................................
याबाबत खेड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना या घटनेबाबत विचारले असता ही घटना खरी आहे. मात्र, तक्रार देण्यास कोणीही आले नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता सीआरपी कलम १४९न्वे राखण्यासाठी तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार यांच्याकडे पत्र व्यवहार केला आहे. त्यावर तात्काळ तहसिलदार सुचित्रा आमले यांनी  भरणे व गायकवाड यांना या गुळाणी येथील शेतजमिनीत जाण्यास मनाई आदेश लागु केला आहे. 

Web Title: karnal brought army soldiers for control of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.