Karnataka Assembly Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात जाणार? मराठी बहुल भागात भाजपासाठी प्रचार करणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 03:39 PM2023-04-29T15:39:39+5:302023-04-29T15:40:54+5:30

Eknath Shinde: बेळगाव आणि आसपासच्या मराठी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही प्रचारासाठी पाचारण करण्यात येणार आहे.

Karnataka Assembly Election 2023: Chief Minister Eknath Shinde will go to Karnataka, campaign for BJP in Marathi dominated areas | Karnataka Assembly Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात जाणार? मराठी बहुल भागात भाजपासाठी प्रचार करणार 

Karnataka Assembly Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात जाणार? मराठी बहुल भागात भाजपासाठी प्रचार करणार 

googlenewsNext

मुंबई - कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. येथे सत्ताधारी भाजपा, मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) या तीन पक्षांमध्ये लढत होत आहे. त्यातही मुख्य लढत ही भाजपा आणि काँग्रेसमध्येच होत आहे. दरम्यान, कर्नाटकमधील सीमाभागात मराठी भाषिक मतं निर्णायक असल्याने या मतांवर भाजपाचा डोळा आहे. तसेच मराठी मतदारांना आकर्षिक करण्यासाठी त्यांच्याकडून रणनीती आखण्यात येत आहे. बेळगाव आणि आसपासच्या मराठी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही प्रचारासाठी पाचारण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे कर्नाटकमध्ये जाण्याची शक्यता आहे. ते मराठीबहूल भागात प्रचार करती. मुख्यमंत्री शिंदे हे सुमारे दोन ते तीन दिवस प्रचारात सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मे महिन्याच्या १० तारखेला मतदान होणार आहे. तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये २२४ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी ११३ जागांची आवश्यकता असते. त्यामुळे यावेळी कुठला पक्ष स्पष्ट बहुमत मिळवतो की, गेल्या वेळी प्रमाणे पुन्हा त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.  

Web Title: Karnataka Assembly Election 2023: Chief Minister Eknath Shinde will go to Karnataka, campaign for BJP in Marathi dominated areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.