कर्नाटकच्या मंत्र्यांकडे निधी का मागितला?
By admin | Published: December 12, 2014 01:32 AM2014-12-12T01:32:08+5:302014-12-12T01:32:08+5:30
सीमाप्रश्न हा सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. संमेलनासाठी कर्नाटकच्या मंत्र्यांकडे निधीची मागणी करायला कशाला गेला होता?
Next
बेळगाव : सीमाप्रश्न हा सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. संमेलनासाठी कर्नाटकच्या मंत्र्यांकडे निधीची मागणी करायला कशाला गेला होता? संमेलनासाठी निधी बेळगावकर मराठी भाषिकांनी गोळा करून दिला असता, असे सवाल संतप्त सीमावासीयांनी बेळगाव नाटय़ परिषदेच्या पदाधिका:यांना केला.
बेळगाव नाटय़ परिषदेच्या बैठकीनंतर ‘बेळगाव बिलॉँगस् टू महाराष्ट्र’ व ‘एकीकरण समिती’च्या युवा कार्यकत्र्यानी नाटय़ परिषद बेळगावच्या अध्यक्ष वीणा लोकूर यांना याबाबत जाब विचारला आणि मोहन जोशी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. बैठकीतील वृत्त सचिवांनी सांगितले आहे. त्याविषयी मला काही बोलायचे नाही, असे सांगून लोकूर निघून गेल्या. मोहन जोशी यांच्या वक्तव्याबद्दल नाटय़ परिषदेच्या बेळगाव शाखेने याबाबत दिलगिरी व्यक्त करूनसुद्धा बेळगावात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव शिवसेनेच्यावतीने नाटय़ परिषद कार्यालयासमोर जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
महाराष्ट्रातील सर्व साहित्य आणि नाटय़संमेलनातून सीमाप्रश्नाचा ठराव केल्याशिवाय महाराष्ट्र सरकारने त्यांना आर्थिक मदत देऊ नये. याशिवाय सीमाप्रश्नाचा ठराव केल्याशिवाय नाटय़संमेलन बेळगावात होऊ देणार नाही. जोशी यांनी माफी मागावी असे एकीकरण समिती बेळगावचे उपाध्यक्ष टी. के. पाटील म्हणाले. सीमाप्रश्नासंबंधी मोहन जोशी यांनी असे वक्तव्य करणो चुकीचे आहे. सीमाप्रश्नाचा ठराव मांडला गेला आह,े कदाचित मोहन जोशी यांना ठाऊक नसावे, असा टोला बेळगाव बिलॉँग्स टू महाराष्ट्रचे पीयूष हावळ यांनी लगावला. संमेलनासाठी कर्नाटक सरकारकडे मदत मागण्याची आवश्यकता काय होती? मराठी भाषिक जनतेने निश्चितच भरघोस निधी गोळा करून दिला असता. शिवजयंती, गणोश चतुर्थी, आदी उत्सव जनतेच्या हातभारानेच साजरे केले जातात, असे एकीकरण समितीचे राजू मरवे यांनी सांगितले.