मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे; करुणा धनंजय मुंडेंची 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 05:15 PM2021-03-18T17:15:14+5:302021-03-18T17:17:11+5:30
karuna sharma dhananjay munde: काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नातं मान्य केलेल्या करुणा शर्मा यांनी आता राजकारणात सक्रीय होणार असल्याचे म्हटले आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी नातं मान्य केलेल्या करुणा शर्मा (karuna sharma) यांनी आता राजकारणात सक्रीय होणार असल्याचे म्हटले आहे. पी उत्तर विभागातील प्रश्न घेऊन करुणा शर्मा यांनी महापालिकेत महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. त्यानंतर त्या बोलत होत्या. (karuna sharma wants to contest assembly election)
गेल्या २५ वर्षांत कधीच घराबाहेर पडले नाही. मागील दोन ते तीन महिन्यांपासून घराबाहेर पडत आहे. लोकांशी बोलत आहे. मला आधी चांगली समाजसेवा करायची आहे. मला लोकांच्या मनापर्यंत पोहोचायचे आहे. मी समाजसेविका आहे. स्वच्छतागृह आणि कचराप्रश्न घेऊन महापालिकेत आले होते. राजकारणातही येण्याची इच्छा आहे. मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे, असे करुणा शर्मा यांनी सांगितले.
केवळ १० दिवसांत हे सगळं झालं; एकनाथ खडसेंनी सांगितल्या 'आतल्या' घडामोडी
अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे केली तक्रार
सोशल मीडियावर खलिफा डॉट कॉमसारख्या अॅप्लिकेशनविरोधात करुणा शर्मा यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडेही एक तक्रार केली आहे. सोशल मीडियावरील खलिफा डॉट कॉमचे फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अश्लील व्हिडीओ असतात, त्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.
वेळ येईल तेव्हा पुराव्यासह बाजू मांडणार
माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घडामोडींविषयीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाने बोलण्यास मनाई केली आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सगळ्या गोष्टी पुराव्यासह बोलेन. माझ्यासोबत जे काही झाले त्यानंतर मी आत्महत्या करणार होते. पण मरण्यापेक्षा मी लढण्याचे ठरवले.माझ्या मुद्यावर पण मी लवकरच बोलणार आहे. पूजा चव्हाण असो किंवा इतर कोणतीही मुलगी तिला न्याय मिळाला पाहिजे, असे करुणा शर्मा यांनी नमूद केले.
नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; नारायण राणेंची मागणी
महिला सक्षमीकरणासाठी लढणार
यापुढे महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले. काही बाबी मीडियासमोर येत नाहीत, अशा महिलांची परिस्थिती खूप वाईट आहे. आत्महत्या करण्यापेक्षा लोकांसाठी काही तरी करुन मरु. मी लोकांना पण न्याय मिळवून देईन आणि स्वतःसाठी पण न्याय मिळवण्यासाठी मी लढणार आहे, असेही त्या म्हणाल्या.