‘कासव’, ‘दशक्रिया’ आणि ‘व्हेंटिलेटर’ची बाजी
By Admin | Published: May 1, 2017 04:21 AM2017-05-01T04:21:49+5:302017-05-01T04:21:49+5:30
सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राजकपूर पुरस्कार आणि चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार तसेच ५४ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट
मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राजकपूर पुरस्कार आणि चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार तसेच ५४ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना राजकपूर जीवनगौरव पुरस्कार आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना आणि व्ही. एन. मयेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी राजकपूर विशेष योगदान पुरस्कार आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान ‘कासव’ने पटकावला. तर, ‘दशक्रिया’ आणि ‘व्हेंटिलेटर’ हे चित्रपटांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोकृष्ट चित्रपट ठरले. उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मंगेश देसाई यांना ‘एक अलबेला’ या चित्रपटासाठी मिळाला उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार इरावती हर्षे यांना ‘कासव’ चित्रपटासाठी मिळाला. (प्रतिनिधी)