गाववाल्या नू...ऐकलस काय...कशेडी घाट आता २ मिनिटांत पार, मार्चअखेरपर्यंत एक बोगदा होणार खुला!

By संदीप बांद्रे | Published: November 11, 2022 07:12 AM2022-11-11T07:12:19+5:302022-11-11T07:15:33+5:30

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणातील सर्वांत मोठा घाट ठरलेल्या कशेडी घाटातील बोगद्यांचे काम ८० टक्के पूर्ण

Kashedi Ghat will be passed in two minutes now A tunnel will be open by the end of March | गाववाल्या नू...ऐकलस काय...कशेडी घाट आता २ मिनिटांत पार, मार्चअखेरपर्यंत एक बोगदा होणार खुला!

गाववाल्या नू...ऐकलस काय...कशेडी घाट आता २ मिनिटांत पार, मार्चअखेरपर्यंत एक बोगदा होणार खुला!

googlenewsNext

चिपळूण (जि. रत्नागिरी) :

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणातील सर्वांत मोठा घाट ठरलेल्या कशेडी घाटातील बोगद्यांचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून आता आतील काँक्रीट रस्त्याचे काम बाकी आहे. एकूण ९ किलोमीटरच्या लांबीत २ किलोमीटरचे समांतर दोन बोगदे आहेत. मार्चअखेरपर्यंत एक बोगदा वाहतुकीस सुरू करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात आले आहे. या बोगद्यामुळे सध्याचा पाऊण तासाचा घाट पार करण्यासाठी अवघी दोन मिनिटेही पुरतील.

कशेडी घाटात ‘ब्लॅक स्पॉट’ ठरलेल्या वळणावर वर्षातून सात ते आठ अपघात होतात. पावसाळ्यात दरडी कोसळून महामार्ग बंद राहतो. घाटाच्या चढ आणि उतारात  तासाभराचा कालावधी जातो. 

वेळेत कमालीची बचत
कशेडी घाटातील १३ किलोमीटर अंतरात अनेक अवघड वळणे आहेत. त्यामुळे खेड ते पोलादपूरच्या दरम्यान तासाभराचा कालावधी लागतो. मात्र, आता या बोगद्यामुळे ४ किलोमीटरचे अंतर वाचणार असून, वेळेची बचतही होणार आहे. अवघ्या दोन ते चार मिनिटात आता बोगदा पार करणे शक्य होणार आहे. 

Web Title: Kashedi Ghat will be passed in two minutes now A tunnel will be open by the end of March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :konkanकोकण