काश्मीर फाईल्स: शरद पवारांचा स्तुतीनंतर यु-टर्न; विवेक अग्निहोत्रींनी सांगितले, त्या विमानात काय घडलेले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 03:40 PM2022-04-11T15:40:39+5:302022-04-11T15:50:42+5:30
Sharad Pawar comment on Kashmir Files: शरद पवार हे कालपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी द कश्मीर फाइल्सवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काश्मीरी पंडितांवरील अत्याचारावर बनविलेल्या 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) ला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, या सिनेमावरून रिलिजपासूनच वाद आहे.१९९० च्या दशकात काश्मीरी पंडितांना हुसकावण्यासाठी जो हिंसाचार झाला त्यावर हा सिनेमा आहे. मुस्लिमांविरोधात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहेत. त्यातच भाजपाने त्याचे प्रमोशन करण्यासा सुरुवात केल्याने त्याला राजकीय रंग आला आहे. आता या वादात शरद पवारांनीही उडी घेतली आहे.
शरद पवार हे कालपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी द कश्मीर फाइल्सवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'एका व्यक्तीने एक फिल्म (द कश्मीर फाइल्स) बनविली आहे, त्यात हिंदूंवर अत्याचार होताना दाखविले आहेत. त्यात कशाप्रकारे बहुसंख्यांक समुह अल्पसंख्यांकांवर अत्याचार करतात आणि जेव्हा बहुसंख्यांक हे मुस्लिम असतील तेव्हा हिंदूंना असुरक्षित वाटू लागते. हे दुर्दैवी आहे कि सत्ताधारी लोक या फिल्मला प्रमोट करत आहेत.' असे पवार म्हणाले.
The man’s name is Vivek Ranjan Agnihotri. Who met you few days ago in the plane, touched your and your wife’s feet and you blessed him and his wife and congratulated them for making a brilliant film on Kashmiri Hindu Genocide. https://t.co/xNIo34j1oN
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) April 11, 2022
यावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केले आहे. एएनआयच्या ट्विटवर हे ट्विट केले आहे. 'या व्यक्तीचे नाव विवेक रंजन अग्निहोत्री आहे. जो तुम्हाला काही दिवसांपूर्वी विमानात भेटला होता. तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या पाया पडला होता. त्याच व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला काश्मीरी हिंदूंच्या नरसंहारावर चांगला सिनेमा बनविल्याने प्रशंसा केली होती.', असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.