कासकरची अटक दाऊदपर्यंत नेणार?, कारवाईचा हेतू तपासण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 03:23 AM2017-09-22T03:23:23+5:302017-09-22T03:23:26+5:30

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आजारी असल्याने त्याची भारतात येण्याची इच्छा असून हीच संधी साधत आम्ही दाऊदला भारतात आणला, अशी टिमकी भाजपा वाजवणार आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी केल्याने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याची अटक आणि दाऊदचे भारतात येणे, याचा अन्योन्य संबंध तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Kaskar's arrest will be carried out to Dawood, attempt to investigate the motive | कासकरची अटक दाऊदपर्यंत नेणार?, कारवाईचा हेतू तपासण्याचा प्रयत्न

कासकरची अटक दाऊदपर्यंत नेणार?, कारवाईचा हेतू तपासण्याचा प्रयत्न

Next

ठाणे : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आजारी असल्याने त्याची भारतात येण्याची इच्छा असून हीच संधी साधत आम्ही दाऊदला भारतात आणला, अशी टिमकी भाजपा वाजवणार आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी केल्याने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याची अटक आणि दाऊदचे भारतात येणे, याचा अन्योन्य संबंध तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.
ठाण्यातील एका बिल्डरकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणात कासकर याला ठाण्यातील खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी भायखळ्यातून अटक केली. ती करताना तो बिर्याणी खाईपर्यंत पोलीस थांबले होते, अशी वृत्ते आहेत. कासकरची चौकशी करण्याकरिता इंटलिजन्स ब्युरोचे दोन अधिकारी ठाण्यात येऊन गेले. तो दाऊदच्या सतत संपर्कात असल्याचे ठाणे पोलीस सांगतात. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यात असलेला कासकर हा दाऊदच्या आजारपणाचे गांभीर्य, त्याच्या भारतात येण्याच्या अटी व शर्ती किंवा तो सध्या ज्या देशात वास्तव्य करीत आहे, त्या देशासोबत गुन्हेगार हस्तांतरातील तरतुदी यासंबंधीची माहिती पोलिसांना पुरवू शकतो. यापूर्वी पोर्तुगालमध्ये असलेला दाऊदचा साथीदार अबू सालेम हा मृत्युदंडाची शिक्षा न देण्याच्या बोलीवर भारतात आला आहे. अलीकडेच त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
मुंबईतील १२ मार्च १९९३ च्या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमला भारतात आणणे (प्रत्यक्षात तो स्वत:हून येत आहे) हे मोदी सरकारला राजकीयदृष्ट्या लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस दलात वरिष्ठ पदावर काम केलेले काही अधिकारी केंद्र सरकारमध्ये मंत्री असून ते पोलीस दलात असल्यापासून ठाण्यात सध्या असलेल्या वरिष्ठ अधिकाºयांचे त्यांच्याशी निकटचे संबंध आहेत. त्यामुळे दाऊद जर स्वत:हून भारतात येऊ इच्छित असेल, तर त्याच्या येण्याचे श्रेय पोलीस दलातील आपल्या निकटवर्तीय अधिकाºयांना मिळावे, याकरिता कासकरवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले गेले असू शकते. दाऊदशी जवळीक असल्याच्या आरोपामुळे बदनाम झालेल्या अधिकाºयाला कासकरच्या अटकेमुळे त्याच्यावरील डाग पुसण्याची संधीही लाभेल, असा विचार त्यामागे असू शकतो. त्यामुळेच कासकर खंडणीच्या प्रकरणात गुंतल्याचे निष्पन्न झालेले असू शकते, असे मुंबईतील खंडणीविरोधी पथकातील एका अधिकाºयाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
राज ठाकरे यांच्यापर्यंत ही माहिती कुणी पोहोचवली, ते स्पष्ट झालेले नाही. मात्र, ज्याअर्थी त्यांनी जाहीर सभेत देशाच्या सुरक्षेच्या बाबीसंबंधी जाहीर भाष्य केले ,त्याअर्थी त्यांचा सोर्स पक्का असणार. बाबरी मशीद पाडली गेल्यावर मुंबईत झालेल्या जातीय दंगलीमध्ये शिवसेनेचा सहभाग असल्यापासून दाऊद टोळीचा शिवसेना व ठाकरे यांच्यावर दात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी, तर एकेकाळी तुमचा दाऊद तर आमचा गवळी अशी गर्जनाही केली होती. दंगली झाल्या तेव्हा राज हे शिवसेनेत उद्धव यांच्यापेक्षा सक्रिय होते. त्यामुळे दाऊदच्या हालचालींबाबत वेगवेगळ्या मार्गाने माहिती घेणे राज यांनी सुरूच ठेवले असू शकते. त्यामुळे राज यांनी गौप्यस्फोट करून एक प्रकारे दाऊदला भारतात आणण्याच्या कथित नाट्यातील हवा काढून घेतल्याचे बोलले जाते.
>गारूड करणे गरजेचे
लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी सरकारला जनतेवर गारूड करण्याकरिता काही ठोस पावले उचलावी लागतील.
पाकसोबत एखादे छोटेमोठे युद्ध मोदी करतील, असा काही राजकीय निरीक्षकांचा होरा आहे, तर काहींना ते अशक्य वाटते.

Web Title: Kaskar's arrest will be carried out to Dawood, attempt to investigate the motive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.