उधारीचे पैसे मागितल्याने हॉटेल चालकावर कत्तीने हल्ला

By Admin | Published: July 22, 2016 05:02 PM2016-07-22T17:02:10+5:302016-07-22T17:02:10+5:30

उधारीचे पैसे मागितल्याने एका हॉटेल चालकाच्या मानेवर, खांदा व डोक्यात पाच वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील नागरसोगा येथे शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या

Katei attack on hotel driver by asking for borrowing money | उधारीचे पैसे मागितल्याने हॉटेल चालकावर कत्तीने हल्ला

उधारीचे पैसे मागितल्याने हॉटेल चालकावर कत्तीने हल्ला

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
औसा, दि. 22 -  उधारीचे पैसे मागितल्याने एका हॉटेल चालकाच्या मानेवर, खांदा व डोक्यात पाच वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील नागरसोगा येथे शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली़. यात गंभीर जखमी झालेल्या हॉटेल चालकावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  दरम्यान, या घटनेतील आरोपी स्वत: औसा पोलिस ठाण्यात हजर झाला असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
नागरसोगा (ता़ औसा) येथील तुकाराम लक्ष्मण ससाणे (६६) यांनी शुक्रवारी पहाटे ४ वाजता आपली चहाची टपरी उघडली आणि चहा करीत होते. तेव्हा गावातील स्वप्नील रामकिशन अडसुळे हा तिथे आला आणि चहा दे रे म्हणाला. यावेळी हॉटेल चालक ससाणे यांनी तू असे का बोलत आहेस असे विचारले़ तेव्हा त्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून व चहा लवकर दे म्हणून हातातील कत्तीने तुकाराम ससाणे यांच्या मानेवर पाच वार केले. मानेवर तीन, खांद्यावर आणि डोक्यात प्रत्येकी एक वार करण्यात आला. अचानक वार झाल्याने ससाणे हे जमिनीवर कोसळले.
दरम्यान, तेथून जाणाऱ्या परमेश्वर शिंदे यांनी ही घटना पाहून इतरांना उठवले व जखमी तुकाराम ससाणे यांना तत्काळ उपचारासाठी औसा येथे हलविले़ प्रथमोपचारानंतर त्यांना लातूरला हलविण्यात आले़ त्यांच्यावर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु असून ५० टाके पडल्याचे सांगण्यात आले. उधारी मागितल्याने आपल्या अंगातील बनियन फाडून कत्तीने वार केले व खिशातील काही पैसे काढून घेतल्याचे ससाणे यांनी पोलिस जबाबात म्हटले आहे. 
दरम्यान, आरोपी स्वप्नील अडसुळे हा स्वत:च पोलिसात हजर झाला. औसा पोलिसांनी त्यास अटक केली आहे. औश्याचे पो.नि. विकास जाधव, उपनिरीक्षक हनुमान बांगर, सपोउनि गुरुलिंग वाडकर, पोहेकॉ दशरथ घाडगे, विष्णू वायगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़ याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Katei attack on hotel driver by asking for borrowing money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.