कालबाह्य कामगार कायद्यांना लावणार कात्री-बंडारु दत्तात्रय

By admin | Published: May 31, 2017 04:24 AM2017-05-31T04:24:05+5:302017-05-31T04:24:05+5:30

देशात सध्या ४४ कामगार कायदे अस्तित्वात असून यातील अनेक कायदे ब्रिटीशकालापासून तसेच आहेत. या ४४ कायद्यांऐवजी

Katrina-Bandaru Dattatreya to introduce unpaid labor laws | कालबाह्य कामगार कायद्यांना लावणार कात्री-बंडारु दत्तात्रय

कालबाह्य कामगार कायद्यांना लावणार कात्री-बंडारु दत्तात्रय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशात सध्या ४४ कामगार कायदे अस्तित्वात असून यातील अनेक कायदे ब्रिटीशकालापासून तसेच आहेत. या ४४ कायद्यांऐवजी केवळ चारच सुटसुटीत आणि कालसुसंगत कायदे आणण्याचा सरकारचा मानस आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात त्याबाबतचे विधेयक आणण्यात येणार असल्याचे केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) बंडारु दत्तात्रय यांनी मंगळवारी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दत्तात्रय यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या काळात कामगार हिताच्यादृष्टीने दूरगामी निर्णय घेण्यात आल्याचा दावा केला. पुढील टप्प्यात असंघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचा मानस आहे. पुढील काळात अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, मिड डे मिल आणि शेवटी घरकाम करणाऱ्या महिलांना टप्प्याटप्याने निर्वाहनिधीचा लाभ देण्यात येईल, असे ते म्हणाले.

Web Title: Katrina-Bandaru Dattatreya to introduce unpaid labor laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.