कावळ्यांनी बदलली दशक्रियेची वेळ!

By admin | Published: April 19, 2017 02:36 AM2017-04-19T02:36:50+5:302017-04-19T02:36:50+5:30

तापमानाचा पारा शिगेला पोहचल्याची जाणीव कावळ्यांनाही झाली आहे. दशक्रिया विधीसाठीच्या काकस्पर्शासाठी सकाळी नऊऐनजी दोन तास

Kavalyane changed time! | कावळ्यांनी बदलली दशक्रियेची वेळ!

कावळ्यांनी बदलली दशक्रियेची वेळ!

Next

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा
तापमानाचा पारा शिगेला पोहचल्याची जाणीव कावळ्यांनाही झाली आहे. दशक्रिया विधीसाठीच्या काकस्पर्शासाठी सकाळी नऊऐनजी दोन तास आधीच कावळे हजेरी लावत आहेत. त्यामुळे दशक्रिया विधीला येणारे नातेवाईक, नागरिक तसेच श्रध्दांजली वाहणाऱ्या नेते मंडळींची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे.
हिंदू धर्मात दशक्रिया विधीतील काकस्पर्शाला विशेष महत्त्व आहे. मृत व्यक्तीच्या पिंडाला काकस्पर्श होण्यावर कुटुंब व नातेवाईकांचे मानसिक समाधान अवलंबून असते. सध्या उन्हाळ्याची तीव्रता आहे. तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. तापमानवाढीमुळे सकाळी दहा वाजल्यानंतर लोक घराबाहेर पडण्याचे टाळतात. पक्षीसुध्दा लवकर बाहेर पडून सकाळी दहा वाजेच्या आत पुन्हा घरट्याकडे धाव घेत आहेत. उन्हाळ््यामुळे मृतांच्या नातेवाईकांनीही दशक्रिया विधीच्या वेळेत बदल करीत सकाळी सात वाजताच हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. ज्या स्मशानभूमीत झाडे नाहीत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी कावळे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात बदल करण्याची वेळ आली आहे़ याने सर्वांची दमछाक होऊ लागली आहे.

Web Title: Kavalyane changed time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.