केबीसी संचालकांच्या रेड कॉर्नरचा मार्ग मोकळा
By admin | Published: August 9, 2014 01:44 AM2014-08-09T01:44:35+5:302014-08-09T01:44:35+5:30
केबीसीचा प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण यांच्या स्टँडिंग अटक वॉरंटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ यू़ कापडी यांनी शुक्रवारी परवानगी दिली़
Next
>नाशिक : राज्यभरातील गुंतवणूकदारांची कोटय़वधी रुपयांची फ सवणूक करून सिंगापूरमध्ये वास्तव्यास असलेला केबीसीचा प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण यांच्या स्टँडिंग अटक वॉरंटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ यू़ कापडी यांनी शुक्रवारी परवानगी दिली़ यामुळे या दोघांच्याही रेड कॉर्नर नोटीसचा मार्ग मोकळा झाला आह़े दरम्यान, अटक केलेल्या संशयितांच्या बँक लॉकरबाबत सोमवारी निर्णय होणार आह़े
केबीसीचा प्रमुख संचालक भाऊसाहेब व आरती चव्हाण यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी न्यायालयाने स्टँडिंग अटक वॉरंटला परवानगी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती़ न्यायालयाने याबाबत पोलिसांकडे कायदेशीर तरतुदींबाबत विचारणा केली होती़ त्यानुसार शुक्रवारी सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणो यांनी न्यायालयाला याबाबतच्या तरतुदींची माहिती तसेच वॉरंटचे महत्त्व सांगितल़े त्यानुसार न्यायाधीश कापडी यांनी चव्हाण दाम्पत्याच्या स्टँडिंग अटक वॉरंटला परवानगी दिली आह़े
केबीसी फ सवणूक प्रकरणात पोलिसांनी अटक केलेले संशयित बापूसाहेब छबू चव्हाण त्याची पत्नी साधना, नानासाहेब चव्हाण, कंपनीचा व्यवस्थापक पंकज सीताराम शिंदे, वाहनचालक नितीन पोपटराव शिंदे, पोलीस संजय वामनराव जगताप त्याची पत्नी कौशल्या, भारती मंडलिक शिलेदार यांचे विविध बँकांमध्ये असलेले लॉकर तपासणीची परवानगीही पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली आह़े यावर सोमवारी न्यायालय निर्णय देणार आह़े (प्रतिनिधी)
स्टँडिंग अटक वॉरंटला परवानगी
देशात गुन्हा करून परदेशात पळून गेलेल्या आरोपींबाबत रेड कॉर्नर नोटीस जारी केली जात़े त्यासाठी न्यायालयाच्या स्टँडिंग अटक वॉरंटची परवानगी आवश्यक असत़े केबीसीचे फ रार संशयित भाऊसाहेब व आरती चव्हाण यांच्या स्टँडिंग अटक वॉरंटची परवानगी आम्ही न्यायालयाकडे मागितली होती़ त्यानुसार आज न्यायालयात या वॉरंटची आवश्यकता सांगितली व न्यायालयाने आम्हाला तशी परवानगी दिली़ - पंकज डहाणो, सहायक पोलीस आयुक्त, नाशिक