KBC घोटाळा : भाऊसाहेब चव्हाण अटकेत
By Admin | Published: May 6, 2016 03:39 PM2016-05-06T15:39:25+5:302016-05-06T15:39:25+5:30
केबीसी घोटाळ्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारा आरोपी भाऊसाहेब चव्हाण याला विमानतळावर आज अटक करण्यात आली आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ : केबीसी घोटाळ्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारा आरोपी भाऊसाहेब चव्हाण याला विमानतळावर आज अटक करण्यात आली आहे. केबीसी कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना अल्पावधीत दामदुप्पट व अधिक व्याजदराचे आमीष दाखवून अनेंकाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे.
२०१४ मध्ये राज्यभरात गाजलेल्या केबीसी घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब छबू चव्हाण, बापूसाहेब छबू चव्हाण, आरती भाऊसाहेब चव्हाण, संजय वामन जगताप, संदीप यशवंतराव जगदाळे, नानासाहेब छबू चव्हाण, साधना बापूसाहेब चव्हाण यांच्याविरूध्द राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झालेले आहेत.
केबीसी कंपनीच्या माध्यमातून असंख्य गुंतवणूकदारांची २२० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा चव्हाणवर आरोप आहे. सिंगापूरला तो पळून गेल्यामुळे त्याला अद्याप अटक झाली नव्हती. मुंबईत आज दाखल होताच त्याला विमानतळावरून अटक करण्यात आली.