'केबीसी' घोटाळा- भाऊसाहेब चव्हाणच्या लॉकरमध्ये 2 कोटींची सोन्याची नाणी

By admin | Published: May 10, 2016 07:17 PM2016-05-10T19:17:22+5:302016-05-10T19:17:22+5:30

भाऊसाहेब चव्हाणच्या बँक लॉकरमधून 2 कोटी किंमत असलेलं 2 किलो 600 ग्रॅम सोन्याची नाणी

'KBC' scam: Bhausaheb Chavan's gold coins worth 2 crores in the locker | 'केबीसी' घोटाळा- भाऊसाहेब चव्हाणच्या लॉकरमध्ये 2 कोटींची सोन्याची नाणी

'केबीसी' घोटाळा- भाऊसाहेब चव्हाणच्या लॉकरमध्ये 2 कोटींची सोन्याची नाणी

Next

 ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 10- लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारा 'केबीसी’चा संचालक भाऊसाहेब चव्हाणला अखेर अटक करण्यात यश आलं. भाऊसाहेब चव्हाणला मुंबई विमानतळावरून अटकही करण्यात आली. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता, भाऊसाहेब चव्हाणच्या बँक लॉकरमधून 2 कोटी किंमत असलेलं 2 किलो 600 ग्रॅम सोन्याची नाणी आढळली. ‘केबीसी’ कंपनीच्या माध्यमातून, गुंतवणूकदारांना अल्पावधीत दामदुप्पट आणि अधिक व्याजदराचं आमिष दाखवून अनेकांना ठकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.. गुंतवणूकदारांना तब्बल 220 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी तो मुख्य आरोपी आहे. गुंतवणुकीपोटी दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून भाऊसाहेब चव्हाणच्या ‘केबीसी’ कंपनीने राज्यभरात लाखो गुंतवणूकदारांना ठकवलं आहे. बरेच जण ‘केबीसी’च्या आमिषाला बळी पडले आणि आयुष्यभराची रक्कम ‘केबीसी’मध्ये गुंतवली. मात्र, यातील बहुतेकांना या पैशावर पाणी सोडावे लागले. त्यांना परतावा तर सोडाच परंतु मूळ रक्कमही मिळाली नाही. या प्रकरणात गुंतवणूकदारांच्या असंख्य तक्रारी फेब्रुवारी 2014ला राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या. त्यानंतर केबीसीचा संचालक भाऊसाहेब चव्हाणसह पत्नी आणि मेहुण्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटक केली. 
‘केबीसी’च्या माध्यमातून दाखवलेली आमिषं
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 7 सदस्य केल्यास महाराष्ट्रात मोफत टूर
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 36 सदस्य केल्यास गोव्यात एक मोफत टूर
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 81 सदस्य केल्यास दर महिन्याला पाच हजारांचा धनादेश
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 252 सदस्य केल्यास एक लाखाचा एक चेक किंवा दरमहा दहा हजार रुपयांचा चेक
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 756 सदस्य केल्यास एजंटला दर महिन्याला 51 हजार रुपये
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 2268 सदस्य केल्यास एजंटला प्रतिमहिना एक लाख किंवा सात लाखाचे दागिने
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 6804 सदस्य केल्यास एक स्कोडा गाडी मोफत
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 12600 सदस्य केल्यास 51 लाखांचा बंगला मोफत
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 25556 सदस्य केल्यास एक कोटी रोख रक्कम मिळणार
 

Web Title: 'KBC' scam: Bhausaheb Chavan's gold coins worth 2 crores in the locker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.