‘केबीसी’ घोटाळा; दाम्पत्यास १३ मेपर्यंत कोठडी
By Admin | Published: May 8, 2016 02:08 AM2016-05-08T02:08:42+5:302016-05-08T02:08:42+5:30
गुंतवणुकीवर तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून राज्यातील सहा हजारांहून अधिक सभासदांची २१० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या केबीसी मल्टिट्रेड अॅण्ड रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेड
नाशिक : गुंतवणुकीवर तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून राज्यातील सहा हजारांहून अधिक सभासदांची २१० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या केबीसी मल्टिट्रेड अॅण्ड रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण व त्याची पत्नी आरती यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला फलके- जोशी यांनी शनिवारी १३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़
शुक्रवारी मुंबई विमानतळावरून दोघांना अटक करण्यात आली होती़ केबीसीचे संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण, आरती भाऊसाहेब चव्हाण, बापूसाहेब छबू चव्हाण, साधना बापूसाहेब चव्हाण, नानासाहेब छबू चव्हाण, पंकज राजाराम शिंदे, नितीन पोपटराव शिंदे, संजय वामनराव जगताप, कौशल्या संजय जगताप (सर्व रा. नाशिक), भारती मंडलिक शिलेदार यांच्याविरोधात एकनाथ खैरनार यांच्या फिर्यादीवरून फसवणूक तसेच महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये आडगाव केबीसीचे संचालकांविरोधात एकनाथ खैरनार यांच्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ (प्रतिनिधी)