केबीसीचा इन्व्हेस्टमेंट गुरू जेरबंद

By Admin | Published: July 27, 2014 02:02 AM2014-07-27T02:02:23+5:302014-07-27T02:02:23+5:30

नाशिकच्या केबीसीपाठोपाठ सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सव्र्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीनेही हजारो गुंतवणूकदारांना कोटय़वधी रुपयांचा चुना लावून गाशा गुंडाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े

KBC's investment guru Jirband | केबीसीचा इन्व्हेस्टमेंट गुरू जेरबंद

केबीसीचा इन्व्हेस्टमेंट गुरू जेरबंद

googlenewsNext
औरंगाबाद : नाशिकच्या केबीसीपाठोपाठ सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सव्र्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीनेही हजारो गुंतवणूकदारांना कोटय़वधी रुपयांचा चुना लावून गाशा गुंडाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े विशेष बाब म्हणजे सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सव्र्हिसेस इंडिया लिमिटेडचा संचालक असलेला दीपक पारखे हा केबीसी घोटाळ्याचा सूत्रधार असलेल्या भाऊसाहेब चव्हाण याचा जवळचा नातेवाईक आहे. तो भाऊसाहेब चव्हाणचा गुरू म्हणून ओळखल्या जात असे. दीपकनेच भाऊसाहेबला मल्टी मार्केटिंगचे तंत्र शिकविले होते. 
सुपर पॉवर कंपनीने औरंगाबादपाठोपाठ मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यालये सुरू केली. शिवाय एजंटही नियुक्त केले. आजघडीला या कंपनीत हजारो नागरिकांनी कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सुपर पॉवरच्या संचालक आणि एजंटांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी संचालक असलेला दीपक केडू पारखे (43) व त्याची पत्नी दिव्या पारखे (35) या दोघांना पुण्यातील मगरपट्टा सिटीतून अटक केली. हे दाम्पत्य नाशिक जिल्ह्यातील पंचवटीचे रहिवासी आहेत.  एजंट शिवाजी पौळ (5क्), सतीश पौळ, शेषराव घुले, प्रधान आडे, हरीश साळवे हे फरार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. 
 
कार्यालयही बंद अन्..
च्नंदा पाटील यांनी या कंपनीत तब्बल 2क् लाख 85 हजारांची गुंतवणूक केली होती. गुंतवणुकीवर त्यांना दरमहा 2क् हजार रुपये परतावा मिळत होता. सहा महिन्यांपासून परतावा मिळणो बंद झाले.
च्  ज्या एजंटांमार्फत त्यांनी गुंतवणूक केली होती, ते एजंट शिवाजी पौळ, सतीश पौळ, शेषराव घुले, प्रधान आडे, हरीश साळवे हेही फोन उचलेनात. तेव्हा केबीसीप्रमाणो या कंपनीनेही गुंतवणूकदारांची फसवणूक केली, असे लक्षात येताच शुक्रवारी नंदा पाटील यांनी जवाहरनगर पोलीस ठाणो गाठले आणि सुपर पॉवरच्या संचालकांसह एजंटांविरुद्ध फिर्याद दिली. 

 

Web Title: KBC's investment guru Jirband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.