डॉक्टर आर्मी आणि फॅमिली डॉक्टर कोविड फायटर संकल्पनेची देशात वाहवा: आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 06:45 PM2021-07-01T18:45:33+5:302021-07-01T18:46:00+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेने कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टरआर्मी आणि फॅमिली डॉक्टर कोविड फायटर या दोन संकल्पना राबविल्या. या दोन्ही संकल्पनांना देशाभरात वाहवा मिळाली असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले आहेत.
कल्याण-कल्याणडोंबिवली महापालिकेने कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टरआर्मी आणि फॅमिली डॉक्टर कोविड फायटर या दोन संकल्पना राबविल्या. या दोन्ही संकल्पनांना देशाभरात वाहवा मिळाली असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले आहेत.
आज डॉक्टर डे निमित्त कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली प्रसूती गृहात आयुक्तांच्या हस्ते डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयुक्तांनी उपरोक्त वक्तव्य केले. अल्प काळात जंबो कोविड फॅसिलीटी उभारणारी केडीएमसी ही राज्यातील एकमेव महापालिका होती. मी महापालिकेच्या आयुक्त पदाचा कारभार व्हॅलेंटाईन डेला घेतला. त्यामुळे काम हेच माझे व्हॅलेंटाईन आहे अशी मिश्कील पुष्टीही आयुक्तांनी यावेळी जोडली. कोविडच्या दुस:या लाटेनंतर महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयात मॉडय़ूलर ओटी सुरु करण्याचा प्रयत्न आहे. वसंत व्हॅली, शक्तीधाम, रुक्मीणी प्लाझा या ठिकाणी आत्ता कायम स्वरुपी रुग्णालये सुरु केली जाणार आहेत. महापालिकेची सध्या १६ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. त्यात वाढ करुन ती २५ केली जाणार आहेत. त्याचबरोबर भविष्यात ३६ नागरी आरोग्य केंद्रे सुरु केली जाणार आहेत. महापालिकेतर्फे डायलेसीस सेंटर सुरु केले जाणार आहे असे आयुक्तांनी वेळी सांगितले.
डॉक्टर डे कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांनी केले. महापालिकेचे डॉक्टर, आयएमए, कॅम्पा, निमा, होमिओपॅथिक आदी वैद्यकीय संघटनांनी कोविड काळात चांगले काम केले. यावेळी इंडिमन मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, भक्ती लोटे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील आदी उपस्थीत होते. यावेळी डॉक्टरांचा विशेष सत्कार आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला.