टाटा आमंत्रा बंद करणे म्हणजे तिसरी लाट येणार नाही, असा शुभ शकून मानायला हरकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 07:17 PM2021-06-30T19:17:46+5:302021-06-30T19:18:18+5:30

कल्याण डोंबिवली महापालिकेचे टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर बंद करणो म्हणजे तिसरी लाट येणार नाही असा शुभ शकून मानायला हरकत नाही असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथे काढले. 

kdmc commissioner facilitated doctors nurses ward boys who have been serving in tata corona care center | टाटा आमंत्रा बंद करणे म्हणजे तिसरी लाट येणार नाही, असा शुभ शकून मानायला हरकत नाही

टाटा आमंत्रा बंद करणे म्हणजे तिसरी लाट येणार नाही, असा शुभ शकून मानायला हरकत नाही

googlenewsNext

कल्याण:कल्याणडोंबिवली महापालिकेचे टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर बंद करणो म्हणजे तिसरी लाट येणार नाही असा शुभ शकून मानायला हरकत नाही असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथे काढले. कोरोना काळात टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटरमध्ये तब्बल दीड वर्षे सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, अधिकारी यांचा सत्कार आज सायंकाळी आयुक्तांच्या हस्ते टाटा आमंत्रा येथे करण्यात आला. 

आयुक्तांच्या हस्ते कार्यकारी अभिंयता घन:श्याम नवांगूळ, प्रमोद मोरे,डॉ. दिपाली मोरे यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळीअतिरिक्त आयुक्त सुनिल पवार,  उपायुक्त  रामदास कोकरे, उपायुक्त सुधाकर जगताप, शहर अभियंत्या सपना कोळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, साथरोग नियंत्नण अधिकारी डॉ. पानपाटील,डॉ. सरवणकर,कार्यकारी अभियंता सुभाष पाटील आदी उपस्थित होते. 

अतिरिक्त आयुक्त पवार यांनी आयुक्त हे मित्र आणि फिलॉसॉफर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे काम करणो शक्य झाले. शहर अभियंत्या कोळी यांनी टाटा आमंत्रा हे चांगल्या आरोग्य सेवेमुळे महाराष्ट्रात वाखाणले गेले. सर्व आरोग्य कर्मचा:यांनी स्वत: जीवाची तमा न बाळगता इतरांनी कोरोनाला भिऊ नका असा धीर देत रुग्णांचे मनोबल मजबूत करीत त्यांना बरे करण्याचे काम केले. टाटा आमंत्रामध्ये दीड वर्षात ४० हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले.
 

Web Title: kdmc commissioner facilitated doctors nurses ward boys who have been serving in tata corona care center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.