त्या दोन अधिकाऱ्यांना केडीएमसी काढली नोटिस; २४ तासांत खुलासा करा अन्यथा कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 09:10 PM2021-09-06T21:10:49+5:302021-09-06T21:11:51+5:30

दावडीतील बेकायदा बांधकाम असलेल्या इमारतीवरील कारवाई न करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दोन अधिका:यांनी बिल्डरकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

kdmc issued notice to two officers | त्या दोन अधिकाऱ्यांना केडीएमसी काढली नोटिस; २४ तासांत खुलासा करा अन्यथा कारवाई

त्या दोन अधिकाऱ्यांना केडीएमसी काढली नोटिस; २४ तासांत खुलासा करा अन्यथा कारवाई

Next

कल्याण-दावडीतील बेकायदा बांधकाम असलेल्या इमारतीवरील कारवाई न करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दोन अधिका:यांनी बिल्डरकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सीसीटीव्हीही समोर आल्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी अधिकारी अनंत कदम आणि दीपक शिंदे यांना नोटिस काढली आहे. या दोन्ही अधिका:यानी येत्या 24 तासात खुलासा करावा असे या नोटिसद्वारे बजावण्यात आले आहे. त्यांचा खुलासा योग्य नसल्यास त्यांच्या विरोधात पुढील कारवाई केली जाईल असे नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. संबंधित अधिकारी त्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून येत आहे. ते त्या हॉटेलमध्ये कशासाठी गेले होते. याची विचारणा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
 

Web Title: kdmc issued notice to two officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.