केडीएमसीच्या घनकचरा प्रकल्पाला मंजुरी
By Admin | Published: April 11, 2016 03:01 AM2016-04-11T03:01:09+5:302016-04-11T03:01:09+5:30
केडीएमसीने स्वच्छ भारत अभियानातंर्गत ११४ कोटीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविला असून तो अहवाल
कल्याण : केडीएमसीने स्वच्छ भारत अभियानातंर्गत ११४ कोटीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविला असून तो अहवाल
अंतिम मंजूरीसाठी केंद्राकडे पाठविला आहे.
केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे असल्याने त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. केंद्राने नुकत्याच जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण डोंबिवलीचा उल्लेख अस्वच्छ शहर म्हणून झाला होता. हा अस्वच्छ शहराचा डाग पुसून काढण्यासाठी केडीएमसीने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आणि ११४ कोटींचा घनकचरा प्रकल्प अहवाल राज्य सरकारला सादर केला. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चाधिकार समितीपुढे केडीएमसी आयुक्त इ.
रवींद्रन यांच्या वतीने सादर करण्यात आला होता. हा अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरीनंतर केंद्राकडे पाठविला आहे.
(प्रतिनिधी)