कल्याणमधील रस्त्यांना मिळणार नवसंजीवनी; महापालिकेने केला "हा" सामंजस्य करार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 10:32 PM2021-08-27T22:32:55+5:302021-08-27T22:33:54+5:30

कल्याणमधील रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी एक महत्वाचं पाऊलं उचललं आहे.

kdms has made reconciliation agreement for roads in kalyan | कल्याणमधील रस्त्यांना मिळणार नवसंजीवनी; महापालिकेने केला "हा" सामंजस्य करार! 

कल्याणमधील रस्त्यांना मिळणार नवसंजीवनी; महापालिकेने केला "हा" सामंजस्य करार! 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

कल्याणमधील रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी एक महत्वाचं पाऊलं उचललं आहे. महापालिका क्षेत्रातील 22 रस्त्यांमधील रस्ता दुभाजक व 7 वाहतुक बेटे यांचे सुशोभिकरण आणि निगा, देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने "एमसीएचआय" या  संस्थे सोबत नुकताच एक सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे कल्याण मधील रस्त्यांना नवसंजीवनी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 
         
सुशोभीकरण करण्याबाबत  आयुक्त सूर्यवंशी यांनी मान्यता दिल्यानंतर करारनामा नुकताच महापालिका प्रशासनाकडून  शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली आणि क्रेडाई एमसीएचआयचे  (CREDAI-MCHI) अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी केला असून यावेळी  महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, CREDAI-MCHI चे सेक्रेटरी विकास जैन, खजिनदार साकेत तिवारी हे उपस्थित होते

काय आहे या सामंजस्य कराराचे स्वरूप? 

महापालिकेच्या विकास आराखडयातील वाहतूक बेटे, रस्ता दुभाजकांचे सुशोभिकरण, निगा, देखभाल करण्यासाठी 5 वर्षाच्या कालावधीसाठी महापालिकेने हा करार केला आहे. रस्ता दुभाजक, चौक यामध्ये हिरवळ, झाडे लावणे व त्यांची दैनंदिन निगा, देखभाल करणे त्याचप्रमाणे प्रत्येक रस्ता दुभाजकाला , गार्ड स्टोनला वर्षातून एकदा रंगरंगोटी करणे. वर्षातून दोन वेळा पाण्याने धुणे आणि किरकोळ दुरुस्ती सुद्धा करण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची राहणार आहे.त्याबदल्यात वाहतूक बेटे, रस्ता दुभाजकाच्या विदयुत खांबावर जाहिरातीचे हक्क विकासकांना विना शुल्क स्वरुपात देण्यात आले आहे.तसेच सामाजिक संदेश व महापालिकेने दिलेले संदेश लावणे संबंधित विकासकास बंधनकारक राहील.

"या" रस्त्यांमधील दुभाजकांचे होणार सुशोभीकरण

 - पुना लिंक रोड( सुचक नाका) ते विठ्ठलवाडी , 
 -  चक्की नाका ते मलंग रोड,
 - चेतना नाका ते साकेत कॉलेज
-  नेतीवली नाका ते चक्की नाका, 
- मूरबाड डायव्हर्शन रोड( दुर्गाडी ते प्रेम ऑटो), 
 - गांधारी रोड ( लाल चौकी ते गांधारी पुल), 
 - संतोषी माता रोड ( सहजानंद चौक ते इंदिरा नगर),     
- बेतुरकरपाडा ते खडकपाडा,
-  बारावे रोड (खडकपाडा ते गोदरेज हिल), 
- बिर्ला कॉलेज ते चिकणघर,
- निक्की नगर ते माधव संकल्प, 
-  विशाल भोईर चौक ते उंबर्डे रोड, 
- एमएसआरडीए 45 मिटर ते साई सत्यम होम्स, 
 -कोलीवली रोड, 
- विश्वनाथ भोईर बंगलो- 18 मिटर ते कडोमपा पाण्याची टाकी,
- काली मश्जिद ते चिकणघर,
- प्रेम ऑटो ते शहाड पूल, 
- शहाड – मोहने रोड, 
-वैष्णवी देवी मंदिर ते टिटवाळा स्टेशन, 
-टिटवाळा स्टेशन ते गणेश मंदिर
- रेल्वे समांतर (90 फुट रोड),
- सावित्रीबाई फुले नाटयगृह रोड, 
-घारडा चौक ते मंजूनाथ शाळा

या सर्कल/ वाहतूक बेटांचे होणार सुशोभीकरण
 
- चक्की नाका सर्कल कल्याण (पूर्व), 
- म्हात्रे नाका सर्कल साकेत कॉलेज रोड  कल्याण (पूर्व),  
- कोळीवली रोड 18 मी. व 15 मी. जंक्शन रस्ता येथील सर्कल, 
- सेंट लॉरेन्स शाळेजवळ आधारवाडी कल्याण (प) येथील सर्कल, 
-कोलीवली सर्कल, 
-प्रांत ऑफिस वायले नगर चौक, 
- टिटवाळा मंदिर सर्कल
 

Web Title: kdms has made reconciliation agreement for roads in kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.