केडीएमटीचे आगार टाकताहेत कात!

By Admin | Published: January 18, 2017 04:04 AM2017-01-18T04:04:24+5:302017-01-18T04:04:24+5:30

पावसाळयात चिखलामुळे होणारी दलदल, यातून बस बाहेर काढताना चालकांची होणारी कसरत हे केडीएमटीच्या आगारांचे चित्र लवकरच बदलणार

KDMT's laying the skull! | केडीएमटीचे आगार टाकताहेत कात!

केडीएमटीचे आगार टाकताहेत कात!

googlenewsNext


कल्याण : पावसाळयात चिखलामुळे होणारी दलदल, यातून बस बाहेर काढताना चालकांची होणारी कसरत हे केडीएमटीच्या आगारांचे चित्र लवकरच बदलणार आहे. आगारांच्या डागडुजीला परिवहन उपक्रमाकडून प्रारंभ झाला असून डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. याअंतर्गत वसंत व्हॅलीसह, गणेशघाट आणि खंबाळपाडा आगारांचा कायापालट केला जाणार आहे.
केडीएमटीच्या उपक्रमाची २८ ठिकाणी आरक्षण आहेत. परंतु यातील गणेशघाट, वसंतव्हॅली आणि खंबाळपाडा आगार वगळता अन्य कुठलीही आरक्षित जागा परिवहनच्या ताब्यात नाही. आजच्या घडीला केवळ गणेशघाट आगार सुरु असून उपक्रमाच्या सर्व बस तेथूनच सुटतात. परंतु आगाराच्या व्यवस्थेकडे पुरते दुर्लक्ष झाल्याने मोडकळीस आलेली कार्यालये हे चित्र तिन्ही आगारांमध्ये सर्रास दिसते.
खंबाळपाडा आगारात कचऱ्याच्या गाड्या उभ्या केल्या जातात. त्यात पावसाळयातील चिखलाची दलदल पाहता तेथील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कल्याणमधील खडकपाडा परिसरातील वसंत व्हॅलीमधील आगाराच्या जागेतही पावसाळयात चिखलाचे साम्राज्य पसरत असल्याने येथेही आगाराबाहेर बस उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे दोन्ही आगार उपक्रमासाठी निरूपयोगी ठरली आहेत. गणेशघाट आगाराची पुरती दुरवस्था झाली आहे. आगारात डांबरीकरण न झाल्याने पावसाळयात याठिकाणीही दलदल होते. आज ११० बस येथे उभ्या केल्या जातात. त्यामुळे बस बाहेर काढताना गोंधळ उडतो. त्यातच पावसाळयात चिखलाचे साम्राज्य असल्याने तो तुडवतच चालकाला गाडीपर्यंत पोहचावे लागते. यामुळे सकाळच्या बस वेळेत बाहेर पडत नाहीत.
या एकंदरीतच वास्तवतेवर ‘लोकमत’मध्ये ‘आॅन द स्पॉट’अंतर्गत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तात बस आगारांची दुरवस्था, १७ वर्षात उपक्रमाला स्वत:च्या पायावर उभे राहणेही जमले नाही, पांढरा हत्ता पोसता कशाला या मुद्यांकडे लक्ष वेधले होते. उत्पन्न आणि खर्चात तफावत असताना बसथांब्यांची झालेली दुरवस्था, रिक्षातळांचे अतिक्रमण, उपक्रमातील घोटाळे, कार्यालयांची दुरवस्था, आगारात वीजअभावी अंधाराचे साम्राज्य या बाबींचाही उल्लेख केला होता.
पहिल्या टप्प्यात आगारांमध्ये डांबरीकरण आणि गटारांची कामे केली जाणार आहेत. यात वसंत व्हॅली आगारात डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून आता गटार बांधणीच्या कामाला प्रारंभ केला जाणार आहे. तर गणेशघाट आगारात सद्यस्थितीला गटार बांधणीचे काम सुरू असून लवकरच त्याठिकाणी डांबरीकरणाचे काम होणार आहे. हे काम सुरू झाल्यानंतर तात्पुरत्या कालावधीसाठी नवीन ३० बस वसंत व्हॅली आगारातून होणार आहे. खंबाळपाडा आगारातही डांबरीकरण, गटारबांधणीचे होणार आहेत. (प्रतिनिधी)
>दुरवस्थेतील कार्यालये सुधारावीत
आगारातील कार्यालये मोडकळीस आली असून येथील स्वच्छतागृहे, रेकॉर्डरूमची देखील दुरवस्था झाली आहे. कार्यालयांमध्ये घुशी आणि उंदरांचा सतत वावर असल्याने कर्मचाऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विश्रामगृहातील पंखे बंद, दिव्याचा पुरेसा प्रकाश नाही, अंथरायला चटई नाही, पावसात गळके छप्पर असे चित्र असल्याने कर्मचाऱ्यांचीही परवड होते. देखभाल दुरूस्तीअभावी येथील रॅम्पला देखील पावसाळयात गळती लागते. सुसज्ज कार्यशाळा नसणे हेही बसच्या नादुरूस्तीचे कारण असून टायर, गाडयांचे स्पेअरपार्ट आगारात विखुरलेल्या अवस्थेत पडले आहेत. ही परिस्थितीही लवकर सुधारावी अशी भावना कर्मचाऱ्यांची आहे.

Web Title: KDMT's laying the skull!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.