केडगाव हत्याकांड; मृतांच्या कुटुंबीयांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 04:49 AM2018-05-13T04:49:34+5:302018-05-13T04:49:34+5:30
केडगाव येथील दोन शिवसैनिकांच्या हत्येचा तपास पोलीस राजकीय दबावाखाली करत असल्याचा आरोप करत मृतांच्या
अहमदनगर : केडगाव येथील दोन शिवसैनिकांच्या हत्येचा तपास पोलीस राजकीय दबावाखाली करत असल्याचा आरोप करत मृतांच्या नातेवाईकांनी शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे़ मृत संजय कोतकर यांच्या केडगाव येथील घरासमोरच हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. केडगाव येथे ७ एप्रिल रोजी महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली़ या हत्याकांडाचा तपास योग्य पद्धतीने होत नसल्याने याबाबत शुक्रवारी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा देण्यात आला होता़ संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम, पत्नी सुनीता, वसंत ठुबे
यांचे बंधू प्रमोद, पत्नी अनिता यांच्यासह त्यांचे नातेवाईक व शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या या उपोषणात सहभागी झाल्या आहेत़