४० टक्के दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शाळेतच ठेवा!
By admin | Published: February 28, 2017 05:12 AM2017-02-28T05:12:26+5:302017-02-28T05:12:26+5:30
किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष शाळा सोडून सर्वसाधारण शाळेत पाठवण्याची सक्ती करू नये
मुंबई : किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष शाळा सोडून सर्वसाधारण शाळेत पाठवण्याची सक्ती करू नये, अशी प्रमुख मागणी राज्यातील अपंग शाळा, कार्यशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संस्थाचालकांनी केली आहे. राज्यात १ हजार २१० अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळा आणि कार्यशाळा आहेत. या शाळा व कार्यशाळांचे संस्थाचालक आणि कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अपंग शाळा, कार्यशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
संघटनेचे सरचिटणीस लक्ष्मीकांत कुलकर्णी म्हणाले की, दिव्यांग शाळेत शिक्षण आणि प्रशिक्षण घेणाऱ्या दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अद्याप राज्याकडे सुधारित धोरण नाही. त्यामुळे जिल्हानिहाय शैक्षणिक बृहत आराखडा तयार करण्याची संघटनेची मागणी आहे. (प्रतिनिधी)