ध्येयावर लक्ष ठेवून कष्टाची तयारी ठेवा - ललिता बाबर-भोसले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 01:29 AM2018-08-13T01:29:54+5:302018-08-13T01:30:12+5:30

कठोर परिश्रम व शिस्तीचे पालन केल्यास यशापासून कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन रिओ आॅलिंपिक खेळाडू ललिता बाबर- भोसले यांनी केले.

Keep a close eye on the goal - Lalita babar-Bhosale | ध्येयावर लक्ष ठेवून कष्टाची तयारी ठेवा - ललिता बाबर-भोसले

ध्येयावर लक्ष ठेवून कष्टाची तयारी ठेवा - ललिता बाबर-भोसले

Next

काटेवाडी - ध्येयावर लक्ष ठेवून कष्टांची तयारी ठेवा. क्षेत्र कोणतेही असो मेहनती शिवाय फळ नाही. कोणतेही गोष्ट आत्मसात करण्यासाठी शिस्त महत्त्वाची आहे. कठोर परिश्रम व शिस्तीचे पालन केल्यास यशापासून कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन रिओ आॅलिंपिक खेळाडू ललिता बाबर- भोसले यांनी केले.
काटेवाडी (ता. बारामती ) येथे शरयू फाऊंडेशन आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ कार्यक्रमात बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातून अनेक क्षेत्रात मुले पुढे येतात. यशस्वी होतात. मी सुध्दा खेडेगावातून आली आहे. मला शिक्षणाची आवड नव्हती. मात्र, मी खेळावर लक्ष केंद्रित केले. गावाकडेच धावण्याचा सराव केला. दररोज घर ते शाळा धावत सराव केला. आई-वडिलांसह काकांनी पाठिंबा दिल्यानेच आॅलिंपिक पर्यंतचे ध्येय गाठता आले. दोन वर्ष कठोर परिश्रम घ्यावे लागले. कुटुंबापासून दूर, रहावे लागले. आवडते पदार्थ खाण्यावर बंधन घातले. टीव्ही पाहता आला नाही. तरीही धेयापासून लक्ष विचलित झाले नाही. धेय गाठण्याची मनात जिद्द होती. अडचणीवर मात करत यश मिळवले.
तत्पुर्वी बाबर यांचे वाद्यांचा गजरात पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वक्तृत्व स्पर्धातील यशस्वी विद्यार्थिनींना त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह देवून गौरवण्यात आले. यावेळी राजवर्धन शिंदे, माळेगावचे संचालक दिपक तावरे, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत ताबिले, संजय काटे, राजेंद्र निंबाळकर, अनिल काटे, महादेव कचरे, अविनाश भिसे, बापू गायकवाड, आबा टकले, अश्विनी खर्चे, मुख्याध्यापक अनिल खैरे, शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक सानिका ब्रह्मदेव कोकरे, द्वितीय क्रमांक शर्वरी प्रवीण शेटे, तृतीय क्रमांक अनिकेत अविनाश नरुटे यांनी पटकविला. समृद्धी नंदकिशोर चव्हाण व ऋतुराज तुषार राऊत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. मध्यम गटात प्रथम क्रमांक श्रेणीका संतोष जांबले द्वितीय क्रमांक नंदीनी जयवंत निंबाळकर तृतीय क्रमांक श्रावणी सचिन उगले उत्तेजनार्थ पारितोषिके सिद्धी अनिल पांढरे व अथर्व सुबोध अवचट यांनी पटकावली.

मला घडवण्याचे श्रेय आजोबांना जाते. मुलगी असूनही मला त्यांनी खेळासाठी स्वातंत्र्य दिले. माझ्यावर विश्वास दाखविला. त्यामुळे खेळाची एकनिष्ठ मैत्री झाली. खेळ हा सर्वत्र उंचावलेला आहे. जगात नाव कमावण्याची संधी मिळते, या साठी खेळ महत्त्वाचा आहे. खेळ कोणताही असो, यासाठी मेहनत व कष्टांतून आवडत्या खेळाची एकनिष्ठ मैत्री करावी विनाकारण आईवडिलासह कुटूंबाचा अपेक्षा भंग होऊ देवू नका.
- ललिता बाबर- भोसले,
रिओ आॅलिंपिक खेळाडू

Web Title: Keep a close eye on the goal - Lalita babar-Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.