NDRF सज्ज ठेवा, लोकांना सुरक्षित स्थळी न्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 08:43 AM2022-07-05T08:43:25+5:302022-07-05T08:43:56+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला पूरस्थितीचा आढावा; जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश

Keep the NDRF ready, take people to safety; Order of CM Eknath Shinde to collector | NDRF सज्ज ठेवा, लोकांना सुरक्षित स्थळी न्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

NDRF सज्ज ठेवा, लोकांना सुरक्षित स्थळी न्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

googlenewsNext

मुंबई - हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून NDRF जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत

विशेषत: रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे.

याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. 

चिपळूण जलमय; जुना भैरी मंदिर रस्ताही पाण्याखाली
गेले काही दिवस चिपळुणात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहेत. शहरातील काही भागात तुंबलेल्या नाल्यांमुळे शहरवासीयांना फटका बसला. या पावसात मुंबई-गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालय परिसरात चक्क तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. याठिकाणी अरुंद मोऱ्या टाकल्याने ओझरवाडी येथील डोंगराचे वाहून येणारे पाणी अडते. त्यामुळे याठिकाणी रुंद मोऱ्या उभारण्याची मागणी केली जात होती. तसेच चौपदरीकरणांतर्गत दोन्ही बाजूंनी गटारे उभारली असली तरी परिसरातील सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्याचा फटका दरवर्षी बसत असल्याने नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग व नगर परिषदेला वारंवार निवेदने दिली आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पावसामुळे जुना काल भैरव मंदिर परिसरात टाकलेल्या भरावामुळे मंदिर ते जिप्सी कॉर्नर दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले.  

Read in English

Web Title: Keep the NDRF ready, take people to safety; Order of CM Eknath Shinde to collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.