पक्षाच्या मुळावर उठणाऱ्यांना बाजूला करा

By admin | Published: January 13, 2017 04:23 AM2017-01-13T04:23:40+5:302017-01-13T04:23:40+5:30

सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघातील पराभवाची कारणमीमांसा करताना मी खोलात गेलो

Keep those who got up on the issue of the party | पक्षाच्या मुळावर उठणाऱ्यांना बाजूला करा

पक्षाच्या मुळावर उठणाऱ्यांना बाजूला करा

Next

सातारा : सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघातील पराभवाची कारणमीमांसा करताना मी खोलात गेलो, तेव्हा सांगलीकरांचा ‘प्रसाद’ घेतलेल्यांची यादी माझ्या हाती लागली. ज्यांना आम्ही कष्टाने निवडून आणले, त्या मंडळींचीच नावे यात आढळून आली. तेव्हा यापुढे विरोधकांकडून पैसे घेऊन पक्षाला अडचणीत आणणारे कार्यकर्ते पक्षात नसतील तरी चालेल,’ असे परखड प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी येथे केले. तसेच ‘पक्षाच्या मुळावर उठणाऱ्यांना बाजूला करा,’ असा स्पष्ट आदेशही खासदार उदयनराजे यांचे नाव न घेता पवार यांनी याच भाषणात दिला.
शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी कारखाना डिस्टिलरी-इथेनॉल प्लँटचे आधुनिकीकरण आणि अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर त्यांनी सडकून टीका केली. मोदींच्या निर्णयाचे दुष्परिणाम सामान्य जनतेला दीर्घकाळ सोसावे लागणार असून, हाच मुद्दा घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सामान्य लोकांना जागृत करा, असा कानमंत्रही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
खा. पवार पुढे म्हणाले, ‘विधान परिषदेच्या निवडणुकीत शेखर गोरेंच्या पराभवाने राष्ट्रवादीला लागलेला ठपका आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत धुऊन काढू. यशवंतराव चव्हाण व किसनवीरांच्या जिल्ह्यात आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते तयार झाले, त्या जिल्ह्यात केवळ पैशांच्या आमिषाने विरोधकांना मते देणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. गरिबातला गरीब कार्यकर्ता निवडून आणण्यासाठी सज्ज व्हा.’ (प्रतिनिधी)

शिवेंद्रसिंहराजेंचीही टीका

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेळाव्याच्या आयोजनामागची भूमिका मांडली. पक्षाच्या ताकदीवर पदे मिळवून पुन्हा पक्षाच्या विरोधात भूमिका घेण्याचा प्रकार थांबला पाहिजे. सातारा तालुक्यातून आम्ही यासंदर्भात घ्यायची ती भूमिका घेतली आहे; पण पक्षानेही याबाबत ठोस भूमिका घेण्याची वेळ आाल्याचे सांगत त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला.

Web Title: Keep those who got up on the issue of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.