बोलताना तरी नैतिकता ठेवा! - मुख्यमंत्री
By admin | Published: April 1, 2016 01:36 AM2016-04-01T01:36:31+5:302016-04-01T01:36:31+5:30
‘सत्तेत असताना तुमचे काय चालायचे, हे आता बोलायला लावू नका. आता बोलताना तरी नैतिकता ठेवा. तुम्ही तिकडनं आलात तर आम्ही इकडनं येऊ हे लक्षात ठेवा,’ असे
मुंबई : ‘सत्तेत असताना तुमचे काय चालायचे, हे आता बोलायला लावू नका. आता बोलताना तरी नैतिकता ठेवा. तुम्ही तिकडनं आलात तर आम्ही इकडनं येऊ हे लक्षात ठेवा,’ असे
खडे बोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावले.
राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे गणेश पांडे प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. भाजयुमोचा निलंबित अध्यक्ष गणेश पांडे याने भाजपाच्याच एका महिला पदाधिकाऱ्याशी आक्षेपार्ह वर्तन केले आहे. त्यामुळे पांडेला तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी करतानाच, ‘तुमच्या पक्षात काय चाललेय,’ असा चिमटाही त्यांनी भाजपाला काढला.
यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘राष्ट्रवादीचा आमदार वाघ याच्यावर बलात्काराचा गुन्हा होता, त्याचे तुम्ही काय केले? मला बोलायला लावू नका, तिकडनं काही आले तर इकडनं तेवढ्याच जोरात येईल, हे लक्षात ठेवा.’ ‘गणेश पांडे प्रकरणात विरोधक केवळ राजकारण करीत आहेत. विनयभंग झाल्याची तक्रार संबंधित महिलेने पोलिसांत दाखल केली आहे. तिने तक्रार करताच पांडेची पक्षातून हकालपट्टी केली, तसेच या महिलेस पोलीस तक्रार करण्यास आ.आशिष शेलार यांनी सांगितले होते, पण तिने नकार दिल्याने हे प्रकरण आम्ही महिला आयोगाकडे सोपविले. आता तिने स्वत:हून तक्रार दाखल केली आहे. पोलीस कारवाई करत असून, कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)