अधिकाऱ्यांच्या मानेवर सुरा ठेवून चंदनाची तोड!
By admin | Published: January 3, 2017 04:45 AM2017-01-03T04:45:09+5:302017-01-03T04:45:09+5:30
औरंगाबाद रोडवरील वनविभागाच्या कार्यालय परिसरात घुसून १० ते १२ जणांनी रात्रपाळीला असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या मानेवर सुरा व करवत ठेवून चार चंदनाची झाडे तोडून
अरुण वाघमोडे,अहमदनगर
औरंगाबाद रोडवरील वनविभागाच्या कार्यालय परिसरात घुसून १० ते १२ जणांनी रात्रपाळीला असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या मानेवर सुरा व करवत ठेवून चार चंदनाची झाडे तोडून नेली़ रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ विशेष म्हणजे वन अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल न करता या यावर पदडा टाकण्याचा प्रयत्न केला़
वनविभागाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या सहा ते सात एकराच्या परिसरात चंदनासह विविध मोठी झाडे आहेत़ रविवारी पहाटे वनमजूर आऱ के़ कोळेकर, एस़एल़ सरोदे, टी़डी. गाडे हे साफसफाईचे काम करत असताना १० ते १२ जण कार्यालय परिसरात आले़ चंदनतस्करांनी वनकर्मचाऱ्यांना दमदाटी करत एका बाजूला बसविले़ कोळेकर यांनी तस्करांना झाडे तोडू नका, असे म्हणताच त्यांच्या मानेवर सुरा व इतरांना करवतीचा धाक दाखवित त्यांनी चार झाडांची कत्तल केली़