केळं, गाजर, खाट ही चिन्हे रद्द

By admin | Published: February 14, 2017 03:44 AM2017-02-14T03:44:24+5:302017-02-14T03:44:24+5:30

केळं, गाजर, खाट अशी नऊ चिन्हे महिलांचा अवमान होतो म्हणून राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहेत.

Kell, carrot, and cot can be canceled | केळं, गाजर, खाट ही चिन्हे रद्द

केळं, गाजर, खाट ही चिन्हे रद्द

Next

कोल्हापूर : केळं, गाजर, खाट अशी नऊ चिन्हे महिलांचा अवमान होतो म्हणून राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहेत. आयोगाच्या तत्कालीन आयुक्त नीला सत्यनारायण यांनी घेतलेला हा निर्णय या निवडणुकांतही कायम आहे.
आयोगाने वेबसाइटवर गत निवडणुकीतील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा अधिकृत निकाल उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये सत्यनारायण यांनी त्यासंबंधीची माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, ‘आयुक्त झाल्यावर उमेदवार, मतदार आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांशी संवाद साधला. त्यातून महिला सदस्यांचे प्रश्न जाणवले. त्यात केळं, गाजर, कुकरसारख्या चिन्हांमुळे महिलांना अपमानित व्हावे लागत होते. या चिन्हांचा भलताच अर्थ काढला जातो, अशी बहुतांशी महिला उमेदवारांची तक्रार होती. एक स्त्री म्हणून संवेदनशीलपणे या प्रश्नांची दखल घेऊन मी तातडीने ही नऊ चिन्हे वगळून टाकली.(प्रतिनिधी)

Web Title: Kell, carrot, and cot can be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.