केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा मृत्यू

By admin | Published: June 10, 2014 01:44 AM2014-06-10T01:44:59+5:302014-06-10T01:44:59+5:30

महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर ओमप्रकाश शर्मा (27) यांचा सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

KEM hospital resident doctor dies | केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा मृत्यू

केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा मृत्यू

Next
>मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर ओमप्रकाश शर्मा (27) यांचा सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांनी एम.डी.ची परीक्षा दिली होती. ओमप्रकाश यांची 13 आणि 14 जूनला एक परीक्षा असल्यामुळे ते मुंबईत थांबले होते. 
ओमप्रकाश शर्मा हे मूळचे चंद्रपूर येथे राहणारे होते. प्रिव्हेंटिव्ह अॅण्ड सोशल मेडिसिन विभागाचे ते निवासी डॉक्टर होते. ते एल्फिन्स्टन येथील वसतिगृहामध्ये राहत होते. 1 जूनला त्यांची एम.डी.ची परीक्षा संपली होती. याच महिन्यात त्यांचा साखरपुडा होणार होता. रविवारी ओमप्रकाश हे साखरपुडय़ाच्या खरेदीसाठी गेले होते. संध्याकाळी वसतिगृहामध्ये आल्यावर त्यांनी केलेली खरेदी  मित्रंना  दाखविली. वसतिगृहातले सगळे मित्र एकत्रच जेवले. यानंतर ओमप्रकाश यांना अॅसिडीटीचा त्रस जाणवू लागला. त्यांच्या एका मित्रने त्यांना एक गोळी दिली. यानंतर त्यांना थोडे बरे वाटले. 
सकाळी उठल्यावर ओमप्रकाश यांना परत त्रस जाणवू लागला. म्हणून ते केईएम रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागामध्ये तपासणीसाठी आले होते. या वेळी त्यांचा एक डॉक्टर  मित्र तेथेच डय़ुटीवर होता. ओमप्रकाश यांनी माङया पोटात दुखतेय, असे या डॉक्टरला सांगितले. ओमप्रकाश यांची तपासणी सुरू होती.  त्यांच्या हृदयाचे कार्य पुन्हा सुरू व्हावे, म्हणून डॉक्टरांनी एक तास प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांना यश आले नाही, अशी माहिती सूत्रंकडून मिळाली आहे. 
ही बातमी ओमप्रकाश यांच्या घरी चंद्रपूरला कळवली आहे. त्यांचे आई-बाबा मुंबईला येण्यास निघाले असून रात्री 12 नंतर ते पोहोचतील. पंचनामा संध्याकाळर्पयत झालेला नव्हता. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येईल, अशी माहिती सूत्रंकडून मिळाली आहे.  ओमप्रकाश यांची प्रकृती उत्तम होती. त्याला आधी हृदयासंदर्भात त्रस कधीच नव्हता. एमडीची परीक्षा झाल्यावर त्याच्याबरोबरचे सगळे मित्र आपल्या घरी गेले होते. 18 तारखेनंतर ओमप्रकाशही घरी चंद्रपूरला जाणार होता. मात्र परीक्षेसाठी तो थांबला होता, अशी माहिती ओमप्रकाशच्या मित्रंकडून मिळाली. मात्र रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: KEM hospital resident doctor dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.