केसरकरांचा आरोप : पंधरा वर्षांची पापे पंधरा दिवसांत कशी धुऊन काढू?

By admin | Published: January 9, 2015 11:39 PM2015-01-09T23:39:00+5:302015-01-10T00:21:12+5:30

नारायण राणे संपलेले प्रकरण

Kesarkar's accusation: How can 15 years of sin be washed in fifteen days? | केसरकरांचा आरोप : पंधरा वर्षांची पापे पंधरा दिवसांत कशी धुऊन काढू?

केसरकरांचा आरोप : पंधरा वर्षांची पापे पंधरा दिवसांत कशी धुऊन काढू?

Next

सावंतवाडी : रेडीला उच्च दर्जाचे बंदर असताना आरोंदा बंदराला परवानगी देणे चुकीचेच आहे. आरोंदा बंदर हे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी जन्माला घातलेले अपत्य आहे, असा आरोप सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी केला. पंधरा वर्षांत राणे यांनी केलेल्या कामांची चौकशी करणार, अशी घोषणाही त्यांनी केली. केसरकर यांनी यावेळी राणे यांनी केलेली पापे पंधरा दिवसांत कशी धुऊन काढू, असा सवालही केला. आरोंदा येथे झालेल्या दगडफेक व लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला. केसरकर म्हणाले, मी या जिल्ह्याचा पालक आहे. त्यामुळे मी माझ्याच लोकांवर लाठीमार करण्याचे आदेश कसे देईन? हे आदेश पोलिसांच्या वरिष्ठस्तरावर होत असतात. त्यात लोकप्रतिनिधींची कोणतीही भूमिका असत नाही. मी फक्त कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेऊ शकतो. लाठीमार करा, एफआयआरमधील कलमे बदला, असे सांगू शकत नाही, असा खुलासाही केला.
चार दिवसांपूर्वी आरोंदा येथे काँग्रेसचे पदाधिकारी गेले होते. जर त्यांनीच या जेटीला परवानगी दिली, तर ते कशासाठी गेले? लोकांना भडकावण्यापेक्षा यातून मार्ग काढून देणे गरजेचे आहे, असे मतही केसरकर यांनी यावेळी मांडले. आतापर्यंत त्यांना आरोंदावासीयांचा पुळका का आला नाही? माझ्या मतदारसंघातील हा प्रश्न असून आरोंदावासीय माझे आहेत. त्यांनी मला मते दिली आहेत. त्यामुळे त्यांची अडचण ती माझी अडचण असून, त्यांना न्याय हा दिलाच जाईल.
प्रदूषणकारी प्रकल्प पर्यटनस्थळी नकोच
आरोंदा हे पर्यटन स्थळ असून तेथे प्रदूषणकारी प्रकल्प येऊ नये, असे मला वाटते, आरोंदा पर्यटनस्थळ म्हणून उदयाला येत आहे. पण तेथे अशा प्रदूषणकारी प्रकल्पाला त्या काळात परवानगी कशी काय देण्यात आली, असा सवाल केसरकर यांनी केला.
आरोंदा व तेरेखोल खाडीपात्राच्या मुखाशी असलेली भिंत जर फोडली गेली, तर त्याचा फटका बांदा व आरोंदा गावांना बसणार आहे. तेरेखोल खाडीपात्राचा उगम आंबोलीतून होतो. निसर्गाला आणखी किती हानी पोहोचवणार, असाही सवाल केसरकर यांनी उपस्थित
(प्रतिनिधी)

नारायण राणे संपलेले प्रकरण
नारायण राणे हे माझ्यावर चुकीच्या पद्धतीने टीका करीत आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर देत राहिलो, तर जिल्ह्याचा विकास होणार नाही. अनेक कंपन्या जिल्ह्यात येऊ पाहात आहेत. पण चांगले वातावरण नसेल, तर ते होणार नाही. त्यामुळे आता टीकेला उत्तर नाही, असे सांगत, नारायण राणे हे माझ्यासाठी संपलेले प्रकरण आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

Web Title: Kesarkar's accusation: How can 15 years of sin be washed in fifteen days?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.