Keshav Upadhye: 'मुख्यमंत्री मंत्रालयात-विधान भवनात जात नाहीत, दिवसरात्र तमाशा सुरू'; केशव उपाध्ये यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 02:14 PM2022-03-13T14:14:21+5:302022-03-13T14:17:39+5:30

Keshav Upadhye:शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले.

Keshav Upadhye | Sanjay Raut | Devenra Fadanvis | 'Chief Minister does not go to Mantralaya-Vidhan Bhavan', Keshav Upadhye slams government | Keshav Upadhye: 'मुख्यमंत्री मंत्रालयात-विधान भवनात जात नाहीत, दिवसरात्र तमाशा सुरू'; केशव उपाध्ये यांचे टीकास्त्र

Keshav Upadhye: 'मुख्यमंत्री मंत्रालयात-विधान भवनात जात नाहीत, दिवसरात्र तमाशा सुरू'; केशव उपाध्ये यांचे टीकास्त्र

Next

मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत असतात. दरम्यान, आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली. यानंतर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आणि राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन सुरू केले. यावरुन संजय राऊतांनी भाजपवर टीका केली होती, त्यांच्या टीकेला आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'सरकारमध्ये दिवसरात्र तमाशा सुरू'
संजय राऊत यांच्या ट्विटला उत्तर देताना केशव उपाध्ये म्हणतात, ''खरोखरच कमाल आहे. पहा ना मंत्रालयात, विधान भवनात मुख्यमंत्री जातच नाहीत. तुम्ही स्वता कोणताही पुरावा हातात नसताना शिवसैनिकांची गर्दी करत वाट्टेल ते आरोप करण्याची प्रेस घेता. महाराष्ट्रातील सरकारमध्ये दिवसरात्र तमाशा सुरू आहे. लोकशाहीत सगळे समान तर ही विशेष वागणूक कशाला?'' असे उपाध्ये म्हणाले.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये उपाध्ये म्हणतात की, ''महावसुली आघाडी सरकारने पोलिसांचा गैरवापर करीत विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न केला,तरी ना जनता शांत बसणार ना देवेंद्रजी भ्रष्ट्राचार काढण्याच थांबणार.'' या ट्विटसोबत त्यांनी आय सपोर्ट देवेंद्र असा हॅशटॅगही वापरला.

काय म्हणाले होते संजय राऊत?
''कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?'' अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.


 

Web Title: Keshav Upadhye | Sanjay Raut | Devenra Fadanvis | 'Chief Minister does not go to Mantralaya-Vidhan Bhavan', Keshav Upadhye slams government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.