‘केसरी टूर्सने ग्राहकाला 3.20 लाख रिफंड करावेत’
By Admin | Published: November 10, 2014 11:32 PM2014-11-10T23:32:30+5:302014-11-10T23:32:30+5:30
मोठय़ा बहिणीचे अपघाती निधन झाल्याने एका ज्येष्ठ नागरिकाला ऐनवेळी परदेशी सहल रद्द करावी लागली. मात्र त्यांची रक्कम रिफंड नाकारणा:या केसरी टूर्स प्रा. लि.ला ग्राहक मंचाने दणका दिला.
पुणो : मोठय़ा बहिणीचे अपघाती निधन झाल्याने एका ज्येष्ठ नागरिकाला ऐनवेळी परदेशी सहल रद्द करावी लागली. मात्र त्यांची रक्कम रिफंड नाकारणा:या केसरी टूर्स प्रा. लि.ला ग्राहक मंचाने दणका दिला. ग्राहकावर आलेल्या आपत्तीविषयी साधी सहानुभूतीही व्यक्त न करता रक्कम नाकारली, यावरही मंचाने खंत व्यक्त केली. टूर्सने तक्रारदारांना 3 लाख 2क् हजार रूपये रिफंड करावेत, 1क् हजार रूपये मानसिक नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून 5 हजार रूपये द्यावा,असा आदेश दिला.
मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य मोहन पाटणकर, क्षितीजा कुलकर्णी यांनी हा आदेश दिला. सतीशचंद्र वसंतराव घटवाल यांनी केसरी टूर्स प्रा. लि. (फग्र्युसन रस्ता), संचालिका ङोलम चौबळ यांच्याविरूद्ध तक्रार दिली होती.
घटवाल यांनी स्वत:सह प}ी व नात अशा तिघांसाठी हे पॅकेज घेतले होते. 17 मार्च 2क्12 रोजी सहलीच्या बुकींगसाठी त्यांनी 9क् हजार रूपये भरले होते. उर्वरित 3 लाख 1क् हजार रूपयेही भरले. 17 मे 2क्12 रोजी सहल निघणार होती. आदल्या दिवशी, 16 मे रोजी रात्री घटवाल यांच्या मोठय़ा बहिणीचे अपघाती निधन झाले. यामुळे त्यांना सहल रद्द करावी लागली. अंत्यविधीनंतर त्यांनी पुन्हा केसरी टूर्सला रक्कम रिफंड करण्याविषयी सांगितले. यावर रक्कम रिफंड होणार नाही. पुढील टुरसाठी प्रत्येकी 25 हजार रूपयांची सवलत दिली जाईल, असे सांगितले. यावर त्यांनी 2क् टक्के म्हणजे 8क् हजार रक्कम वजावट करून देण्यास हरकत नसल्याचेही घटवाल यांनी सांगितले. तरीही त्यांना रक्कम परत मिळाली नाही. केसरी टुर्सच्यावतीने लेखी म्हणणो सादर करण्यात आले की, तक्रारदारांना रक्कम ‘नॉन रिफंडेबल’ असल्याचे माहीत होते आणि सहल त्यांनी रद्द केल्याने सेवेतील त्रुटीचा प्रश्न उद्भवत नाही.