हे काय चावडीवरचे भाषण आहे का?
By admin | Published: December 19, 2015 03:22 AM2015-12-19T03:22:25+5:302015-12-19T03:22:25+5:30
यापुढे औचित्याच्या मुद्यावर संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी एक महिन्याच्या आत उत्तर दिले पाहिजे. जर उत्तर दिले नाही तर त्यासाठी उशीर का झाला याच्या कारणांसह उत्तर दिले
नागपूर : यापुढे औचित्याच्या मुद्यावर संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी एक महिन्याच्या आत उत्तर दिले पाहिजे. जर उत्तर दिले नाही तर त्यासाठी उशीर का झाला याच्या कारणांसह उत्तर दिले जावे असे आदेश अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले.
विधानसभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने उपस्थित केले जातात मात्र त्यावर मंत्री उत्तरं देत नाहीत. आम्ही काय चावडीवर भाषणं करू लागलो काय? असा सवाल आ. बच्चू कडू यांनी केला. यापूर्वीही किती दिवसात मंत्र्यांनी उत्तर दिले पाहिजे याचे निर्देश देण्यात आले होते पण ते पाळले जात नसतील तर या कामकाजाला काय अर्थ आहे असेही कडू म्हणाले. तेव्हा यापुढे एक महिन्याच्या आत उत्तर दिलेच पाहिजे असे निर्देश अध्यक्षांनी दिले. शिवाय गेल्या अधिवेशनात उपस्थित झालेल्या व ज्यांची उत्तरे अद्याप दिली गेली नाहीत अशा औचित्याच्या मुद्यांची उत्तरे सोमवारपर्यंत सभागृहात द्या असेही अध्यक्षांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)