खुशखबर, महाबळेश्वरच्या पर्यटकांना थेट कास पठारावर जाता येणार !

By admin | Published: July 21, 2016 08:17 PM2016-07-21T20:17:11+5:302016-07-21T20:17:11+5:30

महाबळेश्वर, कास पठार आणि बामणोली या भागांतील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणा-या सातारा-कास-बामणोली-गोगवे-तापोळा ते महाबळेश्वर

Khabar Khabar, Mahabaleshwar tourists can go directly to the Kas plateau! | खुशखबर, महाबळेश्वरच्या पर्यटकांना थेट कास पठारावर जाता येणार !

खुशखबर, महाबळेश्वरच्या पर्यटकांना थेट कास पठारावर जाता येणार !

Next

ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. २१ : महाबळेश्वर, कास पठार आणि बामणोली या भागांतील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणा-या सातारा-कास-बामणोली-गोगवे-तापोळा ते महाबळेश्वर या रस्त्यांवरील दोन टप्प्यांचे रुंदीकरण व सुधारणा करणे. तसेच जावळी व वाई तालुक्यांतील इतरही रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सध्या महाबळेश्वरच्या पर्यटकांना कास पठार पाहण्यासाठी मेढा येथून सातारा शहरात येऊन परत वर जावे लागते. हा उलटा प्रवास तब्ब्ल ८५ किलोमीटरचा पडतो. मात्र, तापोळा मार्गे महाबळेश्वर - कास रस्ता जवळपास ३५ किलोमीटरचे अंतर कमी करतो. त्यामुळे हा रस्ता झाल्यास पुणे-मुंबईच्या पर्यटकांना शनिवार-रविवारच्या विकएंडहला ही दोन्ही ठिकाणची पर्यटन स्थळे हसत-खेळत पाहता येतील.
मिनी काश्मिर अशी अशी ख्याती प्राप्त झालेल्या महाबळेश्वर पाठोपाठ जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेले कास पठार पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पर्यटकांना कास पठार, बामणोली, तापोळा आणि महाबळेश्वर पाहण्यासाठी सोयीचे ठरावे, पर्यटक आणि परिसरातील लोकांना दळणवळणासाठी सातारा-कास- बामणोली-गोगवे-तापोळा ते महाबळेश्वर हा मार्ग सुकर ठरावा. वेळेची, इंधनाची आणि पर्यायाने पैशांची बचत व्हावी, यासाठी हा रस्ता खूपच महत्त्वाचा होता.

Web Title: Khabar Khabar, Mahabaleshwar tourists can go directly to the Kas plateau!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.