खडसेंनी मांडली झोटिंग समितीसमोर बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2017 12:48 AM2017-02-15T00:48:23+5:302017-02-15T00:48:23+5:30

भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीसमोर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थित राहून आपली बाजू मांडली.

Khadaseni Mandali Jhatting Committee faces in front | खडसेंनी मांडली झोटिंग समितीसमोर बाजू

खडसेंनी मांडली झोटिंग समितीसमोर बाजू

Next

नागपूर : भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीसमोर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थित राहून आपली बाजू मांडली. ‘अ‍ॅव्हिडेन्स अ‍ॅफिडेव्हिट’ दाखल केले.
महसूलमंत्री पदावर असताना पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन नातेवाइकांच्या नावे खरेदी केल्याचा आरोप खडसे यांच्यावर आहे. या प्रकरणी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती डी. झोटिंग यांची एक सदस्यीय समिती गठित केली आहे. नागपुरातील रविभवन येथील कॉटेज क्रमांक १३ मधून झोटिंग चौकशी समितीचे कामकाज सुरू आहे. गेल्या सात महिन्यांपासून ही समिती चौकशी करीत आहे. चौकशीला होत असलेल्या दिरंगाईबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत शासनाला चांगलेच धारेवर धरले होते. समितीकडून आता उलटतपासणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी खडसेंना उलटतपासणीसाठी नोटीस बजावली असून, समितीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. परंतु आजवर त्यांनी वकिलांमार्फत बाजू मांडल्याने ते स्वत: हजर होतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंगळवारी दुपारी १२ वाजता एकनाथ खडसे हे त्यांचे वकील एम.जी. भांगडे व अ‍ॅड. अमोल पाटील यांच्यासह न्या. झोटिंग समितीच्या कार्यालयात हजर झाले. तब्बल पाऊण तास त्यांनी आपली बाजू मांडली. मिळालेल्या माहितीनुसार, खडसे यांनी आपल्या साक्षी पुराव्याचे अ‍ॅव्हिडेन्स अ‍ॅफिडेव्हिट सादर केले. यावर आता २१ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Khadaseni Mandali Jhatting Committee faces in front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.