मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे १५ आॅगस्टपर्यंत भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 04:49 AM2018-07-20T04:49:55+5:302018-07-20T04:50:23+5:30
मुंबई गोवा महामार्गावर पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे.
नागपूर : मुंबई गोवा महामार्गावर पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळात रस्ते सुस्थितीत राहावे यासाठी १५ आॅगस्टपर्यंत या मार्गावरील खड्डे भरण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. अनिकेत तटकरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेचा माध्यमातून या महामार्गाच्या दुर्दशेचा मुद्दा उपस्थित केला.पनवेल ते इंदापूर या ८४ किमी रस्त्याच्या चौपदारीकरणाचे काम सुरू असून मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
प्रकल्पाच्या सवलत करारनाम्यानुसार रस्ता दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारांची आहे. त्यानुसार काम सुरू आहे. गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात आहे व त्यादृष्टीने रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्याची सूचना संबंधित कंत्राटदाराला देण्यात आली आहे.