निवडणुकीसाठी नेत्यांची खादीस पसंती!
By Admin | Published: January 24, 2017 07:37 PM2017-01-24T19:37:34+5:302017-01-24T19:37:34+5:30
अकोला : निवडणूक कोणतीही असो, निवडणुकीत खादीचेच कपडे वापराचा पायंडा भारतीय संस्कृतीमध्ये रूढ झाला आहे.
अकोला : निवडणूक कोणतीही असो, निवडणुकीत खादीचेच कपडे वापराचा पायंडा भारतीय संस्कृतीमध्ये रूढ झाला आहे. निवडणुकीत नेता नवीन असो की जुना, खादीची कपडे घातण्याला त्यांची पहिली पसंती असते. यामुळेच राजकारण म्हणजे खादी, असे समीकरणच बनले आहे.
मनपा निवडणुकीचा फड सध्या रंगू लागला आहे. उमेदवारीचे बाशिंग गुडघ्याला बांधलेले जुने व नवखे राजकारणी खादीला सर्वाधिक पसंती देत आहेत. सध्या खादी कापडाचे मार्केट चांगलेच वधारल्याचे चित्र आहेत. पांढरे शुभ्र खादीचे कपडे आणि नेत्यांचे जवळचे नाते आहे.
मनपा निवडणुकीच्या फडात अनेक जण आपले नशीब आजमावणार आहेत. सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र सुरू असून मुलाखतीला जाण्यासाठी इच्छुकांनी खादीचे कापडे घेऊन टेलरकडे शिवायला टाकली आहेत. सध्या निवडणुकीचे वातावरण लक्षात घेता, खादी विक्रेते दुकानदारांनी विविध प्रकारचे कापड उपलब्ध करून दिले आहे.
इच्छुक उमेदवार लेनिन, कोसा खादी, सुती खादी आदी कापडांना अधिक पसंती देत आहेत.
----------
टेलर झाले बिझी!
निवडणुकीत उतरणारे इच्छुक उमेदवार रेडिमेड कपड्यांपेक्षा खादीचे कापड घेऊन कपडे शिवण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे राजकारण्यांचे कपडे शिवण्यात स्पेशालिस्ट असलेल्या टेलरांकडे सध्या गर्दी होत आहेत.