खडसे यांना जामीन मंजूर, शेतकरीविरोधी वक्तव्य प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 04:55 AM2017-09-01T04:55:50+5:302017-09-01T04:56:02+5:30

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना जाफराबाद न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. शेतकºयांकडे मोबाइल रिचार्ज करण्यासाठी पैसे आहेत; परंतु वीज बिल भरणा करण्यासाठी नाहीत

 Khadse granted bail, anti-farmer statement case | खडसे यांना जामीन मंजूर, शेतकरीविरोधी वक्तव्य प्रकरण

खडसे यांना जामीन मंजूर, शेतकरीविरोधी वक्तव्य प्रकरण

Next

जाफराबाद (जि. जालना) : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना जाफराबाद न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. शेतकºयांकडे मोबाइल रिचार्ज करण्यासाठी पैसे आहेत; परंतु वीज बिल भरणा करण्यासाठी नाहीत, असे व्यक्तव्य त्यांनी महसूलमंत्री असताना केले होते. त्यामुळे शेतकºयांचा अवमान झाला म्हणून त्यांच्या विरोधात जाफराबाद येथील काँग्रेस कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. जाफराबाद न्यायालयाने एक महिन्यापूूर्वी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना न्यायालयात हजर राहण्याविषयी समन्स बजावले होते. त्यानुसार खडसे गुरुवारी जाफराबाद न्यायालयात हजर राहिले. अ‍ॅड. रामेश्वर अंभोरे यांच्यामार्फत जामीनअर्ज दाखल केला. पंधरा हजारांच्या जमानत रकमेवर त्यांना जामीन मंजूर झाला.

Web Title:  Khadse granted bail, anti-farmer statement case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.