खडसे म्हणतात,'मंत्रिमंडळात येण्याची इच्छा नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 09:25 AM2018-05-14T09:25:00+5:302018-05-14T09:25:00+5:30

राज्य सरकारमध्ये पुन्हा सहभागी होण्याची इच्छा नाही.

KHADSE ‘NOT KEEN’ TO RETURN TO STATE CABINET | खडसे म्हणतात,'मंत्रिमंडळात येण्याची इच्छा नाही'

खडसे म्हणतात,'मंत्रिमंडळात येण्याची इच्छा नाही'

Next

मुंबई- भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दोन वर्षापूर्वी एकनाथ खडसेंनी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण आता मंत्रिमंडळात येण्याची इच्छा नसल्याचं एकनाथ खडसेंनी बोलून दाखविलं आहे. राज्य सरकारमध्ये पुन्हा सहभागी होण्याची इच्छा नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. 

'भाजपातून बाहेर पडण्याचा कुठलाही विचार नसून पक्ष मला माझ्या कुटुंबासारखा आहे. माझ्या कठीण वेळेत पक्षाने मला खूप मदत केली आहे'. असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी, २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसीतील जमीन मूळ मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. जमिनीची किंमत सुमारे ३१ कोटी ११ लाख रुपये असताना, ती अवघ्या तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली. रेडीरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून, भोसरी येथील करोडो रुपयांची जमीन खरेदी करण्यात आली. त्यामुळे या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने, राज्य सरकारने चौकशीची घोषणा केली. पुढे याच आरोपांमुळे खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

2019च्या निवडणुकीला फक्त एक वर्ष बाकी आहे. त्याआधी काही स्थानिक निवडणुकाही होतील. आचारसंहिता लवकरच लागू होणार असल्याने सरकारला फार विकासकामं करता येणार नाहीत, म्हणूनच राज्य मंत्रिमंडळात पुन्हा येण्याची इच्छा नसल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. 

या महिन्याच्या सुरूवातीला भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे यांना क्लीन चिट दिली. जमीन खरेदी प्रकरणी खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल एसीबीने न्यायालयात सादर केला. या निर्णयामुळे खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश दयाराम चौधरी यांना मोठा दिलासा मिळाला. 
 

Web Title: KHADSE ‘NOT KEEN’ TO RETURN TO STATE CABINET

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.