खडसेंनी जातीचा आधार घेऊ नये - प्रकाश आंबेडकर

By Admin | Published: May 31, 2016 07:33 PM2016-05-31T19:33:39+5:302016-05-31T19:44:37+5:30

‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिमशी झालेल्या कथित संभाषणाच्या आरोपांवरून अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर

Khadseeni caste should not be supported - Prakash Ambedkar | खडसेंनी जातीचा आधार घेऊ नये - प्रकाश आंबेडकर

खडसेंनी जातीचा आधार घेऊ नये - प्रकाश आंबेडकर

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
 
नागपूर, दि. 31 -  ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिमशी झालेल्या कथित संभाषणाच्या आरोपांवरून अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी बचाव करत असताना चिमटादेखील काढला आहे. खडसे यांच्या मोबाईलवर कुणाचे दूरध्वनी आले म्हणून ते गुन्हेगार होत नाहीत. परंतु या प्रकरणातून वाचण्यासाठी खडसे यांनी जातीचा आधार घेऊ नये, असे वक्तव्य डॉ.आंबेडकर यांनी केले. नागपुरातील रविभवन येथे ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते. 
खडसेंच्या मोबाईलवर दाऊद इब्राहिमचे फोन आले असे आरोप होत आहेत. परंतु कुणाच्याही मोबाईलवर कुणाचाही फोन येऊ शकतो. खडसे यांनी परत फोन करुन संभाषण केले का याची माहिती उपलब्ध नाही. परंतु खडसे यांनी या प्रकरणात जातीचा आधार घेतला तर त्यांची अवस्था छगन भुजबळांसारखी होऊ शकते, असे डॉ.आंबेडकर म्हणाले. ‘हॅकर’कडे जर संभाषणाची माहिती उपलब्ध असेल तर त्याने ती कुठल्याही दबावात न येता सार्वजनिक करावी. आम्ही त्याला संरक्षण देऊ असेदेखील प्रतिपादन त्यांनी केले.
 
प्रभाग पद्धती बहुजनांसाठी अन्यायकारकच
राज्य शासनाने राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका निवडणुका या बहुसदस्यीय पद्धतीने घ्यायचे ठरविले आहे. शासनाचा हा निर्णय प्रस्थापित राजकीय पक्षांना व त्यांच्या धनदांडग्या उमेदवारांना फायदेशीर आहे. परंतु यामुळे हिंदू समाजातील उपेक्षित घटक व बहुजनांवर अन्यायकारक आहे. यासंदर्भात कॉंग्रेस व भाजपाची विचारसरणी एकच आहे, अशी टीका डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी केली. मुंबई उच्च न्यायालयात याविरुद्ध याचिका दाखल करणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
 
केंद्रात पुढील वेळीदेखील भाजपच येणार 
 
सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता राज्यात पुढील वेळी भाजपाचे सरकार येईल की नाही याची शाश्वती नाही. परंतु केंद्रात मात्र भाजपाच येईल, असे एकूण चित्र आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. हाफिज सईदसंदर्भात संयुक्त राष्ट्रात चीनने आपल्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळी चीनमधील वस्तूंना देशबंदी करायला हवी होती. ते न करता आसाममधील विजयानंतर इतर पूर्वोत्तर राज्यांमध्येदेखील सत्ता स्थापन करू, असा दावा भाजपाने केला आहे. येथे भाजपा सत्तेवर आल्यास येथील स्थैर्य नाहिसे होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चीनसोबतच्या संबंधांवर यामुळे परिणाम होईल व याचा फटका स्थानिकांना बसेल, असे डॉ.आंबेडकर म्हणाले.

 

Web Title: Khadseeni caste should not be supported - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.