खडसेंच्या राजीनाम्याचे जळगावमध्ये पडसाद
By admin | Published: June 4, 2016 07:22 PM2016-06-04T19:22:34+5:302016-06-04T19:22:34+5:30
महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्यानंतरमुक्ताईनगरात कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन करीत जाळपोळ केली तर शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला
Next
>ऑनलाइन लोकमत -
जळगाव, दि. 04 - महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्याची बातमी कळताच जिल्ह्यात जोरदार पडसाद उमटले. खडसेंचा मतदार संघ असलेल्या मुक्ताईनगरात कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन करीत जाळपोळ केली. तसेच कडकडीत बंद पाळला. तुलनेत जळगाव शहरात शांतता होती. सकाळी पक्षाच्या बळीराम पेठेतील जिल्हा कार्यालयात शुकशुकाट होता. मात्र दुपारी आमदार सुरेश भोळे व पदाधिकारी व काही नगरसेवक तसेच कार्यकर्ते कार्यालयात जमले. तेथे बैठक सुरू होती. दुसरीकडे शिवराम नगरातील खडसे यांच्या निवासस्थानी सुरूवातीस शांतता होती मात्र १२.३३ वाजता खडसे यांच्या कन्या जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांचे या ठिकाणी आगमन झाले.
खडसे यांच्या निवासस्थानी १२ वाजण्याच्या सुमारास प्रथम बंदोबस्तासाठीचा एक कॉस्टेबल व घरातील कर्मचारी वर्ग होता. १२.३३ वाजेच्या सुमारास जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर या शिवराम नगरातील निवासस्थानी आल्या. त्यांच्या समवेत प्रांजल खेवलकर हेदेखील होते. त्या पाठोपाठ माजी महानगर प्रमुख अशोक लाडवंजारी, जिल्हा सरचिटणीस दीपक फालक हेदेखील या ठिकाणी आले. दुपारी खडसे कुटुंबिय मुक्ताईनगरकडे रवाना झाले.
विरोधकांनी फोडले फटाके
शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी टॉवर चौकात मिठाई तसेच साखर वाटप केली.