खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक, १२ जुलैपर्यंत कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 06:44 AM2021-07-08T06:44:28+5:302021-07-08T06:45:25+5:30

फडणवीस सरकारमध्ये खडसे हे महसूलमंत्री असताना भोसरी येथे ३.१ एकर भूखंड खडसे यांची पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यात आला होता.

Khadse's son-in-law arrested by ED, remanded till July 12 | खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक, १२ जुलैपर्यंत कोठडी

खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक, १२ जुलैपर्यंत कोठडी

googlenewsNext

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मंगळवारी सुमारे १३ तास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. ईडी न्यायालयाने त्यांना १२ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. खडसे यांची पत्नी मंदाकिनी यांना चौकशीचे समन्स बजाविण्यात येईल, असे सांगण्यात आले. मंगळवारी सकाळी अनिवासी भारतीय (एनआरए) असलेले त्यांचे जावई गिरीश चौधरी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. रात्री १२ वाजेपर्यंत त्यांच्याकडे कसून विचारणा करण्यात आली. मात्र, समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी त्यांना ईडीच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

फडणवीस सरकारमध्ये खडसे हे महसूलमंत्री असताना भोसरी येथे ३.१ एकर भूखंड खडसे यांची पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यात आला होता. ३१ कोटी किंमतीच्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटींना विक्री झाल्याचा दावा केला गेला.  हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसानभरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. 

एकनाथ खडसेंना समन्स; आज होणार चौकशी
भोसरीतील भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना चौकशीला हजर रहाण्याबाबत समन्स बजावले. गुरुवारी सकाळी त्यांना कार्यालयात हजर रहाण्याची सूचना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ईडीच्या कारवाईविरोधात खडसे यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात ईडीला सुनावणी सुरु असेपर्यंत त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या समन्सनंतर खडसे यांची प्रकृती खालावल्याने गुरूवारी होणारी त्यांची पुर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादीतर्फे ट्वीटद्वारे प्रसारमाध्यमांना कळवण्यात आले आहे. 
 

Web Title: Khadse's son-in-law arrested by ED, remanded till July 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.