खालापूरमध्ये पोलिसांची मुजरा पार्टी, १२ मुलींसह २६ जण ताब्यात
By admin | Published: June 8, 2014 10:55 AM2014-06-08T10:55:16+5:302014-06-08T11:22:19+5:30
पोलिस अधिका-याच्या निवृत्त निमित्त आयोजित मुजरा पार्टी रायगड पोलिसांनी उधळून लावली असून याप्रकरणी पोलिसांनी १२ मुलींसह २६ जणांना ताब्यात घेतले आहे.
ऑनलाइन टीम
खालापूर, दि. ८ - रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे एका फार्महाऊसवर पोलिस अधिका-याच्या निवृत्त निमित्त मुजरा पार्टीचे आयोजन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रायगड पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री छापा टाकून ही पार्टी उधळून लावली असून याप्रकरणी पोलिसांनी १२ मुलींसह २६ जणांना ताब्यात घेतले आहे.
खालापूरजवळील कोलथेम या गावातील फार्महाऊसवर मुजरा पार्टी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून ही पार्टी उधळून लावली. पोलिस अधिका-याच्या निवृत्ती निमित्त या पार्टीचे आयोजन केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या पार्टीत अंमली पदार्थाचे सेवन झाले होते का याचा तपास सुरु असल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले.