खरिपाच्या मुहुर्तालाच शेतक-यांवर सुलतानी संकट!

By admin | Published: August 29, 2016 05:19 PM2016-08-29T17:19:40+5:302016-08-29T17:19:40+5:30

शेतकरी आत्महत्यांचा वणवा पेटलेला असतांनाच शेतकºयांवरील अस्मानी व सुलतानी संकटेही वाढतच असल्याचे चित्र आहे. शासनाने यावर्षी खरीपाच्या मुगाला

Khalifa Muhuntake farmers sultani crisis! | खरिपाच्या मुहुर्तालाच शेतक-यांवर सुलतानी संकट!

खरिपाच्या मुहुर्तालाच शेतक-यांवर सुलतानी संकट!

Next
>-  गणेश मापारी 
 
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 29 -  शेतकरी आत्महत्यांचा वणवा पेटलेला असतांनाच शेतकºयांवरील अस्मानी व सुलतानी संकटेही वाढतच असल्याचे चित्र आहे. शासनाने यावर्षी खरीपाच्या मुगाला ५ हजार २२५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असून बुलडाणा जिल्ह्यातील तेराही बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दरानेच नवीन मुगाची खरेदी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. 
सतत तीन वर्ष दुष्काळाचा सामना करणाºया शेतकºयांना यावर्षी पावसाने दिलासा दिला. जुलै महिन्यात खरीपांच्या पिकांना पोषक असा पाऊस झाल्याने शेतकºयांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र दोन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकºयांची चिंता आता वाढली आहे. येत्या तीन ते चार दिवसात पावसाने दमदार हजेरी न लावल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. एकीकडे पाऊस न येण्याचे अस्मानी संकट शेतकºयांवर आले असतांनाच बाजार समित्यांमध्येही मुग खरेदीत कमी भाव मिळत असल्याच्या सुलतानी संकटाचा सामनाही शेतकºयांना करावा लागत आहे. 
शासनाने यावर्षी मुगाला प्रति क्विंटल ४८०० रुपये तसेच ४२५ रुपये बोनस असा एकूण ५२२५ रुपये हमी भाव जाहीर केला आहे. हमी भावापेक्षा कमी दराने मुगाची खरेदी केली जाऊ नये यासाठी बाजार समित्यांना निर्देश देण्यात आले आहेत. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील १३ पैकी एकाही बाजार समितीने हमी भावाचा मुहूर्त साधलेला नाही. चार हजार रुपये पासून तर ४८०० रुपये प्रति क्विंटल या दरानेच मुगाची खरेदी करण्यात येत आहे. १० आॅगस्ट नंतर बाजार समितीमध्ये नवीन मुग येण्यास सुरुवात झाली आहे. बुलडाणा बाजार समितीत ५१०० रुपये  प्रति क्विंटल दराने मुग खरेदी करण्यात आली. मात्र दुसºया दिवशीपासूनच मुगाचे भाव ४३०० ते ४८०० रुपयापर्यंत आले आहे. इतर १२  बाजार समित्यांमध्ये मुगाने ५ हजाराचा भाव पाहिलाच नाही. एकंदरीतच मुग खरेदीमध्ये शेतकºयांची सर्रास लूट होत असताना बाजार समित्याही ‘मूग’ गिळून बसल्या आहेत.
 
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मुहूर्ताला मिळालेला दर
बुलडाणा - 4300
चिखली - 4400
मेहकर - 4501
लोणार - 4100
दे. राजा - 4751
सिं. राजा- 4300
मोताळा - 4100
नांदुरा - 4000
खामगाव - 4750
शेगाव - 4591
संग्रामपूर - 4200
जळगाव  - 4401
मलकापूर - 5000
 
भावात होत आहे घसरण 
४नवीन मुगाची आवक १० आॅगस्ट पासून सुरु झाली आहे. सुरुवातीला विक्रीसाठी येणाºया १ ते २ क्विंटल मुगाची आवक आता ६० क्विंटलवर पोहचली आहे. जिल्ह्यातील ७ ते ८ बाजार समितीत्यांमध्ये मुगाची आवक वाढत चालली आहे. आणि भावात मात्र दिवसेंदिवस घसरणच होत आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवारी ४१०० ते ४५०० प्रति क्विंटल भाव मुगाला मिळाला आहे.
 
खरेदी विक्री संघाचे दूर्लक्ष
शेतक-यांच्या धान्याला चांगला दर मिळावा तसेच हमी भावापेक्षा कमी दराने धान्य खरेदी होवू नये यासाठी खरेदी विक्री संघाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र तेराही तालुक्यात हमी भावापेक्षा कमी दराने मुगाची खरेदी केली जात आहे. या प्रकाराकडे खरेदी विक्री संघाचे दूर्लक्ष आहे. तसेच जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनीही या प्रकाराची दखल घेतलेली नाही.

Web Title: Khalifa Muhuntake farmers sultani crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.