पैसे नाहीत, तर मंगळसूत्र गहाण ठेवा; खामगावच्या कोविड रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 12:08 PM2021-05-24T12:08:35+5:302021-05-24T12:28:24+5:30

Khamgaon News : दहा हजार रुपयांसाठी रुग्णाच्या पत्नीला मंगळसूत्र गहान ठेवण्यास सांगितले.

Khamgaon Hospital keep Mangalsutra as mortgage as patients dont have money | पैसे नाहीत, तर मंगळसूत्र गहाण ठेवा; खामगावच्या कोविड रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

पैसे नाहीत, तर मंगळसूत्र गहाण ठेवा; खामगावच्या कोविड रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Next
ठळक मुद्देरुग्णालयाच्या बिलाची दहा हजारांची थकबाकी होती. सोन्याचे मंगळसूत्र  कोविड सेंटरमध्ये कर्मचाऱ्याने ठेवून घेतले. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: कोरोना रूग्णाच्या उपचारासाठी पैसे नसल्याने एका खासगी  रूग्णालयाने चक्क रुग्णाच्या पत्नीचे मंगळसुत्रच गहाण म्हणून ठेवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस तक्रार होण्यापूर्वीच प्रकरण आपसी तडजोडीने निकाली निघाले आहे.

उपचारासाठी दाखल असलेल्या कोविड रूग्णांच्या पैशाची वसुली करताना खासगी रुग्णालयातील एका कलेक्शन सेंटर मध्ये रुग्णाच्या महिलेची मंगळसूत्र गहाण ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना खामगावात घडल्याने   संताप व्यक्त होत आहे. 

खामगाव तालुक्यातील आवार येथील एका ३० वर्षीय कोरोनाबाधित युवकास उपचारासाठी खामगाव येथील खासगी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, २० मे रोजी आजारातून बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. उपचार सुरू असताना त्यांच्या कुटुंबीयांनी उपचाराच्या खर्चापोटी सुरूवातीला २० हजार रुपये व त्यानंतर ३० हजार रुपये रुग्णालयात दिले. दरम्यान, २१ मे रोजी त्यांच्याकडे रुग्णालयाच्या बिलाची दहा हजारांची थकबाकी होती. तथापि, पैसे जवळ नसल्याने पत्नीने पैसे नसल्याचे कारण सांगितले. त्यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने त्यांना गळ्यातील दहा हजार रुपयाचे मंगळसूत्र ठेवण्यास सांगितले.  सोन्याचे मंगळसूत्र  कर्मचाऱ्याने ठेवून घेतले. त्यानंत कागदपत्रे दिली. ही घटना म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी आहे.

आपसी तडजोडीनंतर प्रकरणावर पडदा!

माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आली. राजकीय पक्षाच्या एका बड्या पदाधिकाऱ्याने ‘तडजोड’ केली. त्यानंतर या घटनेवर पडदा पडला. याप्रकरणी कोणतीही पोलिस तक्रार दाखल न झाल्याने, प्रकरण आपसी तडजोडीतून मिटविण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासन आणि संबंधित रूग्णाच्या नातेवाईकांकडून स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Khamgaon Hospital keep Mangalsutra as mortgage as patients dont have money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.